Maharashtra Politics : मोठी बातमी! राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव, महाराष्ट्रात नव्या समीकरणाची नांदी?

Raj Thackeray Sends Alliance Proposal to Uddhav Thackeray: राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिला. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला हरकत नाही, असे ते म्हणाले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?
Uddhav Thackeray Raj Thackeraysaam tv
Published On

MNS Chief Raj Thackeray Sends Alliance Proposal to Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? हा सवाल गेल्या दशकभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात विचारला जातोय. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलं, त्यानंतर अनेकांनी ठाकरे बंधू एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. याच युतीसाठी आता राज ठाकरेंनी टाळी दिल्याचे दिसतेय. महेश मांजरेकर यांच्या 'वास्तव में Truth' या व्हिडिओ पॉडकॉस्टमध्ये राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिला. आमच्यातील वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वापेक्षा वाद आणि भांडणे खूप छोटी आहेत, असे म्हणत राज ठाकरेंकडून शिवसेनेला एकप्रकारे प्रस्ताव दिला आहे. यावर उद्धव ठाकरेंकडून काय प्रतिक्रिया येतेय, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काहीच चुकीचे नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांनी युतीचा प्रस्ताव पाठवला आहे. आमच्यातील वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे, त्यासाठी एकत्र यायला हरकत नाही, असे राज ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?
Mumbai Water : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २४ तास पाणीपुरवठा बंद, पाहा कोणत्या भागांना बसणार फटका

अजूनही तुम्ही एकत्र येऊ शकता का?, राज ठाकरे म्हणाले...

शिवसेना फुटली किंवा नाही फुटली, तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे म्हणाले, "विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या स्वार्थाचा विषय नाही. कुठल्याही गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडणं किरकोळ आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी बाकी सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार कठीण आहे, असं मला वाटत नाही. माझ्या इच्छेचा आणि स्वार्थाचा प्रश्न नाही."

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?
Pune : पुणेकरांच्या कामाची बातमी, रिक्षाप्रमाणे आता कॅबमध्येही मीटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com