पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

Raj Thackeray Bjp Mp Split Pm Ambition 2029: ठाकरेसेनेतील फुटीनंतर राज ठाकरेंनी भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय... ठाकरेसेनेत खासदारांची फुट नेमकी का झाली? हे सांगताना राज ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय.. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Raj Thackeray addresses party workers in Mumbai, making explosive claims about BJP’s alleged 2029 strategy.
Raj Thackeray addresses party workers in Mumbai, making explosive claims about BJP’s alleged 2029 strategy.saam tv
Published On

ऑपरेशन टायगरनंतर राज्यात भाजपच्या 'ऑपरेशन 2029' ची चर्चा रंगलीय..याला कारण ठरलयं...मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेलं खळबळजनक विधान...मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी थेट भाजपच्या अंतर्गत राजकारणावर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 'गेम प्लॅन'वर बोट ठेवलंय...ठाकरेसेनेतील फुट नेमकी कशासाठी यावर भाष्य करताना राज ठाकरेंनी गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान पदासाठी खासदार फोडल्याचं सांगितलयं....

राज ठाकरेंच्या या विधानामुळे 2029 ला नरेंद्र मोदींऐवजी पंतप्रधानपदी अमित शाह विराजमान होणार असल्याची चर्चा रंगलीय..मुळात भाजपनं 75 वर्षांवरील नेत्यांना राजकीय पद देऊ नये, असं धोरण ठरवले होतं...मात्र 2024 च्या विजयानंतरही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीचं विराजमान झाले.. आता 2029 ला होणाऱ्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी 79 वर्षांचे होतील... त्यामुळे पक्षातील इतर नेत्यांकडे पंतप्रधान पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता अनेकदा वर्तवण्यात आलीय..त्यात पंतप्रधान पदी अमित शाहांच्या नावाची चर्चा राज ठाकरेंच्या विधानामुळे सुरु झालीय...

मात्र त्यातही खासदारांची फुट पंतप्रधानपद टिकवण्यासाठी असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय...तर दुसरीकडे आपला पक्ष सांभाळा असं म्हणत नवनाथ बन यांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय...एकीकडे भाजप महायुती मजबूत असल्याचा दावा करत असताना, राज ठाकरेंनी थेट भाजपमधील अंतर्गत वादावर आणि अमित शाह यांच्या महत्त्वाकांक्षेवर बोट ठेवल्यानं 2029 ला पंतप्रधानपदी कोण बसणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com