

Rain Update News : राज्यात काल अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली होती. मागील आठवडाभर धो-धो कोसळणाऱ्या पावसाने मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही काल ब्रेक घेतला होता. मुंबईत तुरळक पावसाची नोंद झाली होती. विदर्भातील हवामानही कोरडं होतं.
आज राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर मुंबईत पावसाचं प्रमाण आजही कमी राहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील २१ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Maharashtra News)
शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट महिना खरिप पिकांच्या दृष्टीने महत्वाचा असतो. मात्र ऑगस्ट महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील बऱ्याच भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिना शेतकऱ्यांची चिंता वाढणारा ठरु शकतो. (Latest News)
जून महिन्यात सरासरीपेक्षा तब्बल ५४ टक्के कमी पाऊस पडला होता. तर मात्र जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरसरीच्या ९४ ते ९९ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.