Rain Forecast in Maharashtra : राज्यात पुढील ४-५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, उद्या पुण्यासह ४ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

Rain alert in state : राज्यात उद्या २४ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Rain Forecast for Maharashtra
Rain Forecast for Maharashtra Saam TV
Published On: 

Mumbai Rain News : राज्यात पावसाने २-३ दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. मात्र पुढील ४-५ दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बांगलादेशच्या किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

आज ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. नंतर पुढील २४ तासांत Gangetic WestBengal ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४-५ दिवस राज्यात मुसळधार पावसाची (Heavy Rain)  शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात उद्या ४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर २४ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  (Maharashtra News)

Rain Forecast for Maharashtra
Raj Thackeray News VIDEO : राज ठाकरेंचा आवडता रील स्टार येताच भाषण थांबवून म्हणाले, अरे तू पण आलास? वर ये, पुढे काय घडलं?

कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

उद्या पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Latest News)

Rain Forecast for Maharashtra
Thane Traffic Update: मोठी बातमी! ठाण्यात दिवसा अवजड वाहनांना बंदी; मालवाहतुकीला असे आहेत पर्यायी मार्ग?

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसांचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com