ZP Election Result: रायगडात तटकरेंना जोरदार धक्का, मंत्री गोगावलेंच्या मुलाचा विजय

Raigad Politics: रायगडमध्ये सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांचा विजय झाला आहे. विकास गोगावलेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
ZP Election Result: रायगडात तटकरेंना जोरदार धक्का, मंत्री गोगावलेंच्या मुलाचा विजय
Raigad Politicssaam tv
Published On

Summary -

  • रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत विकास गोगावलेंचा विजय

  • या निकालामुळे राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांना मोठा धक्का

  • विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणूक लढवत विजयी झाले

  • विजय होताच महाडमध्ये समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला

सचिन कदम, रायगड

रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला. महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांचा विजय झाला. महाड नगरपरिषद निवडणुकीमध्ये विकास गोगावलेंनी प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत विजय मिळवला. विकास गोगावले यांचा विजय होताच गोगावले यांच्या समर्थकांनी गुलाल उधळ एकच जल्लोष केला. सध्या महाडमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी मतदारसंघात यावेळी चांगलीच लढत पाहायला मिळाली. भरत गोगावले यांचा मुलगा आणि युवासेनेचे सचिव विकास गोगावले पहिल्यांदाचा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या निवडणुकीमध्ये अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मतदानाच्या दिवशी जोरदार राडा झाला होता. दोन गटात हाणामारी झाली होती.

ZP Election Result: रायगडात तटकरेंना जोरदार धक्का, मंत्री गोगावलेंच्या मुलाचा विजय
ZP Election Results : धक्कादायक निकाल! सोलापूरमध्ये आमदाराच्या मुलाचा पराभव, खासदाराला जोरदार धक्का

या प्रकरणी भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावलेंसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे सर्वजण फरार झाले होते. पण त्यानंतर त्यांना उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरकारला झापल्यानंतर हे सर्वजण महाड पोलिस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. आता या निवडणुकीमध्ये विकास गोगावले यांचा विजय झाला आहे.

ZP Election Result: रायगडात तटकरेंना जोरदार धक्का, मंत्री गोगावलेंच्या मुलाचा विजय
Pune ZP Election Result : पुण्यात भाजपाला धक्का! जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com