Raigad : अंगावर याल तर जिल्ह्यातून हद्दपार करू; शिवसेनेचा राष्ट्रवादीला इशारा

आमच्या नादी लागला तर जिल्ह्यात जी हालत शेकापची झाली आहे तशी तुमची करून जिल्ह्यातून हद्दपार करू, असा इशारा रायगड जिल्ह्यातील तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.
Raigad : अंगावर याल तर जिल्ह्यातून हद्दपार करू; शिवसेनेचा राष्ट्रवादीला सज्जड इशारा
Raigad : अंगावर याल तर जिल्ह्यातून हद्दपार करू; शिवसेनेचा राष्ट्रवादीला सज्जड इशाराSaamTvNews
Published On

- राजेश भोस्तेकर

रायगड : राज्यात आघाडीचे सरकार आहे. ते टिकले पाहिजे असे आम्हालाही वाटते. परंतु रायगड (Raigad) जिल्ह्यात पालकमंत्री आणि खासदार जिल्ह्यात होणारी विकासकामे आम्हीच करीत असल्याच्या अविर्भावात आहेत. त्यामुळे शिवसेनेवर अन्याय करत आहेत. शिवसेनेच्या कामाचे श्रेय स्वतःच घेत आहेत. हा अन्याय आता सहन करणार नाही. आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर गप्प बसणार नाही. अंगावर याल तर सोडणार नाही. आमच्या नादी लागला तर जिल्ह्यात जी हालत शेकापची झाली आहे तशी तुमची करून  जिल्ह्यातून हद्दपार करू, असा इशारा रायगड जिल्ह्यातील तीन आमदारांनी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसला दिला आहे.

हे देखील पहा :

रायगड जिल्ह्यातील शिवसेनेची (Shivsena) आढवा बैठक अलिबाग (Alibag) येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या निवसस्थानी झाली. या बैठकीत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री बदलून शिवसनेचा कुठलाही मंत्री पालकमंत्री म्हणून द्या अशी मागणी सर्वच वक्त्यांनी केली. या बैठकीला आमदार महेंंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार तुकाराम सुर्वे, दक्षिण-रायगड प्रमुख अनिल नवगणे, शिरीष घरत,  जिल्हापरिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, तसेच  इतर पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

Raigad : अंगावर याल तर जिल्ह्यातून हद्दपार करू; शिवसेनेचा राष्ट्रवादीला सज्जड इशारा
डोंबिवलीत धक्कादायक घटना; सोफासेट मध्ये आढळला महिलेचा मृतदेह..!

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस याची महाविकास आघाडी आहे. जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदारांनी आणलेल्या कामाचे श्रेय देखील पालकमंत्री घेत आहेत. आम्ही गप्प बसणार नही. लवकरच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री बदला अशी मागणी करणार आहोत. आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही, असे आमदार भरत गोगावले म्हणाले.  

Raigad : अंगावर याल तर जिल्ह्यातून हद्दपार करू; शिवसेनेचा राष्ट्रवादीला सज्जड इशारा
Amruta Fadnavis : 'देवेंद्रजी ३०-३५ पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत सहज खायचे'

महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi) यांनी सुरुवातीलाच आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आवाज उठवला. रायगडात शेकापक्षाचा आता एकही आमदार नाही. तुमचा एकच आहे. त्यामुळे सावध रहा, सुधारा अन्यथा जिल्ह्यातून हद्दपार करु, असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीला  दिला.

Raigad : अंगावर याल तर जिल्ह्यातून हद्दपार करू; शिवसेनेचा राष्ट्रवादीला सज्जड इशारा
धक्कादायक : नागपूरमध्ये १४ वर्षीय मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार!

पालकमंत्री हटविल्याशिवाय गप्प बसणार नाही, श्रीवर्धचा आमदार देखील आम्ही बदलू असे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले. माजी आमदार मनोहर भोईर, दक्षिण-रायगड प्रमुख अनिल नवगणे, शिरीष घरत यानी देखील आपल्या भाषणात आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या पालकमंत्री हटावच्या मागणीला  पाठिंबा असल्याचे सांगितले. आजच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत पालकमंत्री हटावचा नारा घुमला असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याचे पडसाद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com