Raigad Crime : बोगस डॉक्टरचा कारनामा; गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने महिलेला रक्तस्त्राव, प्रकृती चिंताजनक

Raigad Wrong Birth control Pills Bleeding : गर्भपाताच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने आणि अयोग्य प्रमाणात देण्यात आल्याने महिलेला त्रास झाल्याचं झालं आहे. मात्र, या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
Shrivardhan Bogus Doctor Gives Wrong Birth Control Pills
Shrivardhan Bogus Doctor Gives Wrong Birth Control PillsSaam Tv News
Published On

रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातल्या कुडगाव येथील एका बोगस डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तरुण महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोगस डॉक्टरने गर्भपाताच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने दिल्याने महिलेला प्रचंड रक्तस्त्राव होऊन तिची प्रकृती गंभीर झाली आहे. या प्रकरणी संबधित बोगस डॉक्टर शंकर कुंभार याच्याविरोधात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिघी सागली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

आपल्याला योग्य उपचार मिळावा म्हणून एक महिला गर्भधारणा संपवण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथील खासगी दवाखान्यात गेली होती. बोगस डॉक्टर शंकर कुंभार याने कोणतीही वैद्यकीय चाचणी किंवा सोनोग्राफी न करता तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. डॉक्टरने दिलेल्या या गोळ्यांचा परिणाम उलटा झाला आणि त्या महिलेला प्रचंड रक्तस्त्रावाला सामोरे जावं लागलं. काही वेळाने तिची प्रकृती खालावत गेली, तेव्हा नातेवाइकांनी तिला तातडीने तालुका उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली.

Shrivardhan Bogus Doctor Gives Wrong Birth Control Pills
Bhandara Crime : दोघांची घनिष्ट मैत्री, बायकोचं मित्रासोबत विवाहबाह्य संबंधाचा संशय, ग्रामपंचायत सदस्याला घरातच संपवलं

गर्भपाताच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने आणि अयोग्य प्रमाणात देण्यात आल्याने महिलेला हा त्रास झाल्याचं पुढील तपासात उघड झालं आहे. मात्र, या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये बोगस डॉक्टरवर फसवणूक आणि जीवाला धोका निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Shrivardhan Bogus Doctor Gives Wrong Birth Control Pills
बापरे! बस चालवताना IPL मॅच बघणे पडले महागात; ST महामंडळाने चालकाला नोकरीवरून काढलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com