Raigad Politics: रायगडचे राजकारण तापलं! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेसेनेसोबत आघाडी; तटकरेंचा इन्कार, म्हणाले...

Raigad Political News: रायगडमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांनी एकत्र येत आघाडी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Raigad Politics: रायगडचे राजकारण तापलं! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेसेनेसोबत आघाडी; तटकरेंचा इन्कार, म्हणाले...
Raigad PoliticsSaam Tv
Published On

Summary -

  • कर्जत–खालापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ठाकरेसेना एकत्र

  • सुनील तटकरे यांनी आघाडीचे वृत्त फेटाळून लावले

  • ती फक्त बैठक होती असे ते म्हणाले

  • आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवर जोरदार हल्ला चढवला

सचिन कदम, रायगड

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. निवडणुकांसाठी तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत मात्र रायगडमध्ये निवडणूकांचे वातावरण तापू लागले आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये आगामी निवडणुकीत आमदार महेंद्र थोरेवे यांना शह देण्यासाठी रणनिती आखली जात आहे. रायगडच्या कर्जत - खालापूर मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आहेत. त्यांनी परिवर्तन आघाडीचा जयघोष केला. कर्जतमधील राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत आघाडी न झाल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुधाकर घारे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत एकत्र आले आहेत. त्यांनी खालापुरमध्ये एकत्रित बैठक घेतली. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून हे दोन नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला एकत्रित येत सामोरे जाणार आहेत असे खात्रिलायक वृत्त आहे. यासंदर्भातील बॅनर देखील सोशल मिडियावर झळत आहेत.

Raigad Politics: रायगडचे राजकारण तापलं! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेसेनेसोबत आघाडी; तटकरेंचा इन्कार, म्हणाले...
Raigad Shocking : रायगडमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीने मेहुण्याच्या घरात आयुष्य संपवलं

मात्र कर्जत खालापुरमधील आघाडी आणि आघाडीबाबतचे हे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी फेटाळून लावले आहे. ही दिवाळीच्या पार्श्वभुमीवर झालेली बैठक असल्याचे सांगत तटकरे यांनी वेळ मारून नेली आहे. तर दुसरीकडे कर्जत- खालापुरमधील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या दोन्ही नेत्यांच्या आघाडीची बैठक आणि सुनील तटकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवर टीका केली. तटकरे यांची कुटर निती असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Raigad Politics: रायगडचे राजकारण तापलं! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेसेनेसोबत आघाडी; तटकरेंचा इन्कार, म्हणाले...
Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दरम्यान, रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आघाडी केल्याचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हल्ला केला. ही दळभद्र युती ठाकरेंच्या संमतीने झाली असल्याचे सांगत तटकरे म्हणजे कुत्र्याची शेपूट असल्याचे ते म्हणाले. बेइमानी ही तटकरेंच्या रक्तात असल्याने ते तसेच वागणार असल्याचा घणाघात त्यांनी केला.

Raigad Politics: रायगडचे राजकारण तापलं! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेसेनेसोबत आघाडी; तटकरेंचा इन्कार, म्हणाले...
Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com