Raigad Accident News: भरधाव वेगाने घेतला जीव! दुचाकीचा भीषण अपघात; ३ तरुणांचा जागीच मृत्यू

Raigad Road Accident: अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळेच हा भीषण अपघात झाला.
Accident News
Accident NewsSaamtv
Published On: 

सचिन कदम, प्रतिनिधी....

Vakan Pali Road Accident News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघातांची मालिका सुरू आहे. रायगड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रायगडच्या वाकण पाली मार्गावर मोटर सायकलच्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

Accident News
Mysore Accident News: मोठी बातमी! म्हैसूरमध्ये भीषण अपघात; दोन मुलांसह १० जणांचा जागीच मृत्यू

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, रायगडच्या (Raigad ) वाकण पाली मार्गावर भरधाव वेगात ट्रिपल सीट प्रवास करताना झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ओमकार देशमुख (वय 20, रा. सुधागड), ऋषिकेश लोखंडे (वय 24, रा. कल्याण) आणि यश चव्हाण (वय 21 रा. पालघर) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

ते तीनही तरुण एकाच गाडीवर बसून ट्रीपल सीटने प्रवास करत होते. त्यांची भरधाव वेगात असलेली दुचाकी वजरोली गाव हद्दीतील जंगली पिर दर्ग्याजवळ आली असता अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळेच हा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये तीनही तरुणांना जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.. (Latest Marathi News)

Accident News
Sakal-Saam Mahasurvekshan: मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण! पंतप्रधानांच्या कामगिरीबाबत लोकांना काय वाटतं?

कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये भीषण अपघात....

दरम्यान, कर्नाटकमधून ही एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये कार आणि खासगी बसमध्ये हा अपघात झाला असून अपघातात दोन मुलांसह 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात कारमधील एक जण थोडक्यात बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com