Raigad : होमगार्ड गिरवणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!

अलिबाग जिल्हा होमगार्ड कार्यालयात तीन दिवसाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण 50 होमगार्ड यांना दिले जाणार आहे. यामध्ये होमगार्ड यांना लेक्चर तसेच प्रात्यक्षिके शिकवली जाणार आहेत.
Raigad : होमगार्ड गिरवणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!
Raigad : होमगार्ड गिरवणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!राजेश भोस्तेकर
Published On

-- राजेश भोस्तेकर

रायगड : सण, आंदोलन, मोर्चा असला की पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड आपली सेवा बजावत असतो. कोरोना, नैसर्गिक आपत्ती काळातही होमगार्ड यांनी अहोरात्र पोलिसांना मदत केली. होमगार्ड हा नैसर्गिक आपत्ती काळातही मदतीला धावून येऊन आपली सेवा चोख बजवावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे धडे गिरवू लागला आहे. अलिबाग जिल्हा होमगार्ड कार्यालयात तीन दिवसाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण 50 होमगार्ड यांना दिले जाणार आहे. यामध्ये होमगार्ड याना लेक्चर, प्रात्यक्षिके शिकवली जाणार आहेत. होमगार्ड प्रमुख ब्रिजेश सिग याच्या संकल्पनेतून जिल्हा होमगार्ड, नागरी दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन याच्या संयुक्तपणे हे प्रशिक्षण तीन दिवस सुरू राहणार आहे.

हे देखील पहा :

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून नैसर्गिक आपत्तींने थैमान घातले. जिल्हा प्रशासन सह पोलीस, होमगार्ड दल या नैसर्गिक आपत्तीत चोख भूमिका बजावत आहेत. होमगार्ड हे पोलिसांच्या मदतीसाठी बनविलेले दल आहे. मात्र या दलात येणाऱ्या तरुणांची संख्या ही कमी आहे. कारण मिळणारे काम हे कमी दिवसाचे आहे. कोरोना काळात मात्र होमगार्ड याचा मोठा सहभाग पोलीस विभागाला मिळाला. त्यामुळे होमगार्ड मध्ये अधिक जणांना सामावून घेण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी प्रशिक्षण कार्यक्रम उदघाटन सोहळ्यावेळी केली. अप्पर पोलीस अधीक्षक आणि जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांनी केलेल्या मागणीनुसार होमगार्ड कार्यालय हे नव्याने बांधून त्याठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा हॉल सह अद्यावत इमारत बांधण्याची ग्वाहीही कल्याणकर यांनी यावेळी दिली.

Raigad : होमगार्ड गिरवणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!
लातुरात एसटीला लागला ब्रेक, जिल्ह्यातील 5 आगरासमोर उपोषण सुरू!

होमगार्ड हे सुद्धा आपत्ती काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आपली जबाबदारी पार पडत असतात. आपत्ती काळात काय करणे गरजेचे आहे, नागरिकांचे संरक्षण कसे करायचे याबाबत प्रात्यक्षिक प्रशिक्षण होमगार्ड याना दिले जाणार आहे. यासाठी मुंबई येथील प्रशिक्षक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्यामार्फत प्रशिक्षण तीन दिवस दिले जाणार आहे. या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे, सागर पाठक हे उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com