Raigad : रोहा रेल्वे क्रॉसिंगवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन, वर्षभरात काम पूर्ण होणार

30 कोटी रुपये खर्चाच्या या कामाचे भुमीपुजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले.
Raigad : रोहा रेल्वे क्रॉसिंगवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन, वर्षभरात काम पूर्ण होणार
Raigad : रोहा रेल्वे क्रॉसिंगवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन, वर्षभरात काम पूर्ण होणार SaamTVNews
Published On

-- राजेश भोस्तेकर

रायगड : रोहा ते नागोठणे मार्गावरील प्रवाशांची रेल्वे क्रॉसिंग मधून लवकरच सुटका होणार आहे. रोहा (Roha) येथे पिंगळसई क्रॉसिंगवर साडे आठशे मीटर लांबीचा पूल बांधला जाणार आहे. 30 कोटी रुपये खर्चाच्या या कामाचे भुमीपुजन खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या हस्ते झाले. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हे काम होणार असून ते वर्षभरात हे काम पूर्ण होईल. पडम येथील दुसऱ्या रेल्वे क्रॉसिंगवरील (Railway Crossing) पुलाच्या कामालाही फेब्रुवारी पर्यंत सुरुवात होईल, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), रेल्वेचे मुख्य प्रकल्प अधिकारी प्रेमेंद्र कुमार जैन यावेळी उपस्थित होते.

हे देखील पहा :

कोकण रेल्वे ही अर्थमंत्री मधू दंडवते आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रयत्नाने रोहापर्यत पहिल्यांदा दाखल झाली. पिंगळसई आणि पडम येथे दोन रेल्वे क्रॉसिंग असून रेल्वे आल्यानंतर प्रवाशांना पाच ते दहा मिनिटं थांबावे लागत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर पूल बांधण्याची मागणी गेली अनेक वर्षे रोहेकराकडून केली जात होती. अखेर खासदार सुनील तटकरे याच्या प्रयत्नाने पिंगळसई येथील पुलाचे (Bridge) काम मंजूर झाले असून कामास सुरुवात झाली आहे.

Raigad : रोहा रेल्वे क्रॉसिंगवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन, वर्षभरात काम पूर्ण होणार
वर्ष उलटले तरी राज्याला मिळेना पूर्णकालिक पोलीस महासंचालक!

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या राज्य शासनाच्या मंडळामार्फत हे काम होत आहे. यासाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) निधी मंजूर केला असुन आरके मदाने कंपनी या पुलाचे काम वर्षभरात पूर्ण करणार आहे. त्यामुळे वर्षभराने रोहेकारांना रेल्वे क्रॉसिंग समस्येपासून सुटका मिळणार आहे. चांगल्या दर्जाचे काम लवकरात मर्यादी कालावधीत पूर्ण करावे. ठेकेदार कंपनीने कामाचा दर्जा उत्तम ठेवावा असे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या भाषणातून म्हटले आहे. रेल्वे क्रॉसिंग पुलामुळे नागरिकांची होणारी गैरसोय थांबली जाणार आहे. दळणवळण सुविधा वाढल्यानंतर शहराच्या विकासातही भर होणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com