Raigad : सहा नगरपंचायतीसाठी ७४.२० टक्के मतदान; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

महिनाभर पहावी लागणार निकालाची वाट!
Raigad : सहा नगरपंचायतीसाठी ७४.२० टक्के मतदान; मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
Raigad : सहा नगरपंचायतीसाठी ७४.२० टक्के मतदान; मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद SaamTV
Published On

-- राजेश भोस्तेकर

रायगड : रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या ७९ प्रभांगासाठी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणूकीला मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळाला. सहा नगरपंचायत निवडणुकीत ७४.२० टक्के मतदान झाले असून २३३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. मतमोजणी पुढील महिन्यात १९ जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना एक महिना निकालासाठी वाट पहावी लागणार आहे.

हे देखील पाहा :

मंगळवारी सकाळी साडे सात वाजता मतदान (Voting) प्रक्रीयेला सुरवात झाली. सुरवातीला मतदारांचा प्रतिसाद कमी होता, दुपारनंतर मात्र तो वाढत गेला. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सरासरी ३३.६६ टक्के मतदान झाले. दुपारी दिड वाजेपर्यंत ५२.०९ टक्के मतदान झाले. तर साडे तीन वाजे पर्यंत ६५.८३ टक्के मतदान झाले होते. साडे पाच वाजे पर्यंत ८५ टक्के मतदान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, साडेपाच वाजेपर्यत ७४.२० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला महिलांच्या तुलनेत पुरुषांचा जास्त प्रतिसाद पहायला मिळाला. ३४ हजार ६३९ मतदारांपैकी २५ हजार ७०३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती मिळत आहे.

सहा नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat Election) १०२ पैकी ७९ प्रभागांसाठी निवडणूक प्रक्रीया पार पडली. २ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ८२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली. २३३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. निकालासाठी (Result) मात्र पुढील महिन्याची वाट पहावी लागणार आहे. उर्वरीत प्रभागांसाठी निवडणूक प्रक्रीया पुर्ण झाल्यावरच मतमोजणी होणार आहे.  

Raigad : सहा नगरपंचायतीसाठी ७४.२० टक्के मतदान; मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
OBC समाजाच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार : छगन भुजबळ

पाली (Pali) मधील १७ पैकी १३ प्रभागांसाठी निवडणूक प्रक्रीया पार पडली. ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. इथे १५ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले, साडेतीन वाजेपर्यंत ६८.२४ टक्के मतदान झाले होते. साडे पाचपर्यत ८०.४३ टक्के मतदान झाले. खालापूर (Khalapur) मधील १७ पैकी १६ प्रभागांसाठी निवडणूक झाली. ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. इथे १६ मतदानकेंद्रांवर मतदान घेण्यात आले. साडेतीन वाजेपर्यंत ७४.७ टक्के मतदान झाले होते. तर साडेपाच पर्यत ८४.६६ टक्के मतदान झाले.

तळा (Tala) नगरपंचायतीच्या १७ पैकी १२ प्रभागांसाठी निवडणूक प्रक्रीया पार पडली. ३५ उमेदवार इथे रिंगणात होते. १२ मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन वाजे पर्यंत ६८.९२ टक्के मतदान झाले होते. साडे पाच पर्यत ७३.८५ टक्के मतदान झाले. म्हसळा (Mhasala) नगरपंचायतीच्या १७ पैकी १२ प्रभागांसाठी निवडणूक झाली. इथे ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १२ मतदान केंद्रांवर दुपारी साडेतीन वाडेपर्यंत ६१.५३ टक्के मतदान झाले होते. साडेपाच पर्यत ७३.८२ टक्के मतदान झाले.

Raigad : सहा नगरपंचायतीसाठी ७४.२० टक्के मतदान; मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
SSC HSC Exam : जाणून घ्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे विषयनिहाय वेळापत्रक

पोलादपूर (Poladpur) नगरपंचायतीच्या १७ पैकी १३ प्रभागांसाठी निवडणूक झाली. ३९ उमेदवार निवडणूक लढवत होते. १३ मतदान केंद्रांवर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६२.२३ टक्के मतदान झाले होते. साडे पाच पर्यत ७१.०९ टक्के मतदान झाले. माणगाव (Mangaon) नगरपंचायतीच्या १७ पैकील १३ प्रभागांसाठी मतदान झाले. इथे ३० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १४ मतदान केंद्रांवर दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ६२.२१ टक्के मतदान झाले होते. साडे पाच पर्यत ७०.५२ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रीयेसाठी ५१६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com