लातूर: औसा तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध गुडगुडी जुगार आणि दारुच्या विक्रीत मोठी वाढ झालीये. भादा पोलिसांनी कारवाई करत 6 आरोपींना अटक केली आहे (Raids on illegal gambling and liquor selling by Bhada police).
औसा तालुक्यातील अंदोरा गावामध्ये उर्स यात्रेत बसून पाचजण गुडगुडी जुगार खेळत असल्याचं आढळून आलं. कापडी बॅनरवर एकूण 6 कप्प्यात वेगवेगळी चित्रे असलेल्या बॅनरचे चित्रावर गुडगुडी नावाचा जुगार खेळत आणि खेळवीत असताना यांना पकडण्यात आलं आहे.
यावेळी उटी येथील 52 वर्षीय गुडगुडी चालक आयुब हबीब शेख आणि सोबत इतर 4 अशा पाच जणांना अटक केलीये. यामध्ये एकूण 2,260 रुपयांची रोख रक्कम आणि बॅनर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तर, येल्लोरीवाडी शिवारात तळ्याच्या जवळ शेतात 62 वर्षीय आरोपी काशिनाथ साहेब चिंचोलकर हा देशी आणि विदेशी दारुची बेकायदेशीर चोरटी विक्री करत असताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून देशी दारुच्या 86 बॉटल, विदेशी दारुच्या 10 बॉटल असा एकूण 6,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.