Pune Crime : स्वारगेट अत्याचार घटना; पुण्यातील घटनेमध्ये मोठी अपडेट समोर, अत्याचाराआधी नराधमाने तरुणीला...

Pune Swargate Depot Rape News : आरोपी दत्तात्रय गाडे याने अत्याचार करण्यापूर्वी तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरडाओरड केल्यास ठार करेन, अशी धमकी दत्तात्रय याने दिली होती.
Accused Dattatray Gad threatens girl
Accused Dattatray Gad threatens girlSaamTV
Published On

पुणे : पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये घडलेल्या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते वसंत मोरे यांनी देखील डेपोत जाऊन डेपोची तोडफोड केलीय. याचदरम्यान, या घटनेमध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याने अत्याचार करण्यापूर्वी तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरडाओरड केल्यास ठार करेन, अशी धमकी दत्तात्रय याने दिली होती.

वसंत मोरेंकडून डेपोची तोडफोड

पुण्यात घडलेल्या घटनेमुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत. स्वारगेट एसटी डेपोतून फलटण येथे जाणाऱ्या २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार घडल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी थेट स्वारगेट येथील आगार येथे जाऊन सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली. स्वारगेट डेपोच्या परिसरामध्ये अनेक गंभीर प्रकारच्या घटना घडत असल्याचा त्यांनी दावा देखील केला. तसेच सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट डेपो परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे इथे दररोज बलात्कार होतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे? असा संतप्त सवाल देखील त्यांनी विचारला.

Accused Dattatray Gad threatens girl
Swargate Bus Depot: ३० कंडोम, ५ साड्या, ६ ब्लँकेट,१ चादर, ३ अंतर्वस्त्र..; पुण्यातील बंद पडलेल्या बसमध्ये आणखी काय काय? बघा VIDEO

जुन्या एसटीबसमध्ये कंडोम, दारुच्या बाटल्या

स्वारगेट एसटी डेपोच्या कडेला बंद पडलेल्या एसटीमध्ये दारूच्या बाटल्या आणि कंडोमचा खच पडलेला आहे. सर्व गोष्टींना येथील प्रशासन व्यवस्था आणि सुरक्षारक्षक जबाबदार आहेत. त्यामुळे कठोरातील कठोर कारवाई या सर्वांवर झाली पाहिजे, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली. सर्व प्रकरणांमध्ये आता सुरक्षा कर्मचारी आणि संबंधित आगार प्रमुख यांच्यावर देखील कारवाई होणे अपेक्षित आहे. अशी कारवाई न झाल्यास आगामी काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिक आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील वसंत मोरे यांनी यावेळी दिला.

Accused Dattatray Gad threatens girl
Vasant More : खळखट्ट्याक; डेपोच्या काचा फोडल्या, बसची तोडफोड; ठाकरेसेनेचे वसंत मोरे आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com