
पुणे : पुणे स्वारगेट डेपोत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेनंतर स्वारगेट डेपोमधील २३ सुरक्षारक्षक यांचं तात्काळ निलंबन करण्यात आलं आहे. उद्यापासून नवीन सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. घटनेचा तपास करताना पोलिसांना एक मोठी लीड मिळाली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे घटना घडल्यावर शिरुरला म्हणजे त्याच्या राहत्या घरी गेल्याची माहिती मिळाली असल्याचं समजत आहे.
गुन्ह्यात आरोपीने पायात घातलेला शूज पोलिसांना त्याच्या घरातून मिळाला आहे. पोलिसांकडून घरून शुज आणि कपडे हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपीचा तातडीने शोध घेतला जात आहे. आरोपीने अत्याचार करताना पीडितेला धमकी दिल्याचं देखील समोर आलं आहे. अत्याचाराची वाच्यता कुठे केली तर जीवे मारुन टाकण्याची धमकी त्याने दिली होती. त्यामुळे घडलेल्या प्रकरणाची पीडितेने वाच्यता केली नाही.
दत्तात्रय हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा आहे. आरोपीचं लग्न झालेलं आहे. तो बिगारी काम करत असून त्याला दोन मुलं देखील आहेत. घरातल्या लोकांची चौकशी केली असता ते म्हणाले की, दत्तात्रय हा काल घरातून निघून गेला होता. त्याचा फोनही लागत नाहीय. आरोपीच्या घरी पत्नी, दोन मुलं, आई, वडील आणि भाऊ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.