Pune News : डोंगरावर लागलेल्या आगीचं रुद्ररुप; पुण्यात प्लायवूड गोदामाला भीषण आग, शेजारील वस्तीला धोका

Pune Rajgurunagar Fire Plywood Warehouse : प्लायवूड गोदामाच्या जवळील घरांना देखील आगीचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने आगीने रुद्ररुप धारण केल्याचं समोर आलं आहे.
 Pune Rajgurunagar plywood warehouse fire
Pune Rajgurunagar plywood warehouse fireSaamTv
Published On

पुणे : पुण्यातील खेड तालुक्यातील आसखेड येथील प्लायवूड गोदामाला आग लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोंगराला लागलेल्या वनव्याची आग थेट प्लायवूडच्या गोदामावर आली असून या आगीत प्लायवूडचे गोदाम आगीत जळून खाक झाल्याचं समोर आलं आहे. आग लागल्यानंतर परिसरात आगीसह धुराचे लोट दिसत होते.

 Pune Rajgurunagar plywood warehouse fire
Mumbai-Pune Tourist Spots : मुंबई पुणे जवळील 'या' स्वर्गसुंदर हिल स्टेशनवर फिरायला गेलात का?

प्लायवूड गोदामाच्या जवळील घरांना देखील आगीचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने आगीने रुद्ररुप धारण केल्याचं समोर आलं आहे. डोंगर माळरानावर लागणाऱ्या वणव्याच्या घटनांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने डोंगराचा वनवा थेट लोकवस्तीलगत येऊन अशा दुर्दैवी घटना घडत आहे.

 Pune Rajgurunagar plywood warehouse fire
Ahilyanagar News: नगर पुणे महामार्गावर टँकर उलटला, डिझेल भरण्यासाठी नागरीकांची झुंबड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com