Rushiraj Sawant : ६८ लाख खर्चून बँकॉकला कशासाठी निघालो? ऋषीराज सावंतने पोलिसांना सर्वच सांगितले

Tanaji Sawant Son New Update: राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बँकॉक रिटर्न होऊन त्याचा आणि त्याच्या मित्रांचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.
rushiraj sawant
rushiraj sawantsaam tv
Published On

पुणे: नेहमीच वादग्रस्त विधानाने चर्चेत राहणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात आता नवीन उपडेट समोर आली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची बातमी ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. माजी मंत्र्याच्या मुलाचे अपहरण झाले समजताच गल्ली ते दिल्लीपासून सर्वच यंत्रणा खडकन जागी झाली आणि वेगाने शोध मोहीम सुरू केली. परंतु ऋषीराज सावंत याचे अपहरण झाले नसून तो आपल्या मित्रांसोबतच एका खासगी चार्टर्ड प्लेनने बँकॉकच्या दिशेने गेल्याची माहिती नंतर पोलिसांकडून देण्यात आली.

rushiraj sawant
Pune Crime: पुण्यात खाकी पॅटर्न! जिथं माज दाखवला, तिथंच उतरवला; हवालदाराला मारहाण करणाऱ्या तरुणाची काढली धिंड

ऋषिराज सावंत हा एकटा गेला नसून त्याच्यासोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर असे त्याचे दोन मित्र हे देखील होते. त्याला परत आणण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले त्याला सुखरूप आणून त्याचा आणि त्याच्या मित्रांचा पोलिसांनी जबाब नोंदवला. यावेळी त्याने कबूल केले की, तो "बिझनेस ट्रिप" साठीच चालला होता. ऋषीराज याने त्याच्या घरी बँकॉकबद्दल सांगितले आहे का, नाही याबद्दल दोन्ही मित्रांना काही कल्पना नव्हते असे जबाब मध्ये म्हटले आहे. तसेच एक मित्र हा सावंत यांच्या एका संस्थेत कार्यरत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com