Accident News: पीएमटी बस– दुचाकीची धडक; विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

पीएमटी बस– दुचाकीला धडक; विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
Pune Accident News
Pune Accident NewsSaam tv

पुणे : पुण्यात नांदोशी आणि सणसनगर या गावांच्या दरम्यान पीएमटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक (Accident) झाली. या धडकेत किरकटवाडीतील अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. (Letest Marathi News)

Pune Accident News
Zilla Parishad News : जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागतील शाखा अभियंता लाच घेताना सापडला; गुन्हा दाखल

स्वराज दत्ता हगवणे असे मृत झालेल्‍या (Student) विद्यार्थ्याचे नाव आहे. स्वराज हा सकाळी कॉलेजला जातो, म्हणून घरातून गेला होता. कॉलेजमधील मित्रांनी मिळून सणसनगर येथील विहिरीत पोहायला जाण्याचे ठरवले. कॉलेजचे लेक्‍चर बंक करत सहा मित्र दुचाकींवरुन सणसनगर येथे गेले.

परत जाताना वळणावर अपघात

तेथून परत येताना मंगळवारी (१५ नोव्‍हेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नांदोशी व सणसनगर या गावांदरम्यान असलेल्या ओढ्याजवळील वळणावर किरकटवाडीकडून सणसनगरकडे येत असलेल्या पीएमटी बसची आणि स्वराज चालवत (Accident News) असलेल्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे मध्यरात्री उपचारांदरम्यान स्वराज हगवणे याचा मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com