RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी दिली खोटी माहिती; १८ पालकांवर गुन्हा दाखल

Pune News : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षण असलेल्या जागांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यानुसार पालकांकडून पाल्याचा प्रवेशसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यात आले
RTE Admission
RTE AdmissionSaam tv
Published On

सागर आव्हाड 
पुणे
: शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत आर्थिक, दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा आरक्षित असतात. यासाठीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली असून आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी पालकांकडून खोटी माहिती भरण्यात आली. सदरचा प्रकार उघड झाल्याने अशा १८ पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षण असलेल्या जागांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यानुसार पालकांकडून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित होण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहे. यांची छाननी होऊन लॉटरी पद्धतीने तीन फेऱ्यांमधून प्रवेश दिला जात असतो. याकरिता शासनाने ठरवून दिलेल्या निकषात पात्र विद्यार्थांनाच आरक्षणांतर्गत प्रवेश दिला जात असतो. मात्र यात खोटी माहिती भरल्याचा प्रकार जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत माताळवाडी भुगाव येथे घडला.

RTE Admission
Amravati Accident : कापूस विक्रीसाठी घेऊन जाताना शेतकऱ्यावर काळाचा घाला; भरधाव वाळू डंपरची वाहनाला धडक

अशी केली फसवणूक
दरम्यान सदरच्या फसवणुकीच्या प्रकारात पालकांनी त्यांच्या पाल्यांना आरटीई मधील प्रवेश घेण्यासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर केला. शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

RTE Admission
Pimpalgaon Bajar Samiti : टोमॅटो विक्रीचे ४ कोटी रुपये अडकले; टोमॅटो उत्पादक आक्रमक, कांदा लिलाव पाडला बंद

१८ पालकांवर गुन्हा दाखल 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन चंद्रकांत भोसले (वय ३४), खंडू दिलीप बिरादार (वय ३३), रामकृष्ण तानाजी चोंधे (वय ४०), सुमित सुरेश इंगवले (वय ३४), विजय सुभाष जोजारे (वय ३४), मंगेश गुलाब काळभोर (वय ४३), रोहिदास मारुती कोंढाळकर (वय ३६), श्रीधर बाबुराव नागुरे (वय ३८), बाबासाहेब छबुराव रंधे (वय ४०), विलास रामदास साळुंखे (वय ३४), गणेश राजाराम सांगळे (वय ३५), रुपेश बाळकृष्ण सावंत (वय ३८), दिगंबर पंडित सावंत (वय ४०), चंदन अंकुश शेलार (वय ४४), कुंभराम सांगिलाल सुतार (वय ३३), मंगेश झगुलाल गुरव (वय ३३), विवेक जयवंत जोरी (वय ३०), उमेश हिरामण शेडगे (वय ४०) अशी गुन्हा दाखल झालेल्या पालकांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com