Pune News: उच्चदाब वाहिनीवरुन केबल टाकण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; एकाचा मृत्यु, एक जखमी

शिंदे यांच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला झाला आहे.
Pune News
Pune NewsSaam Tv

अक्षय बडवे

Latest Pune News: उच्च दाब वाहीनीवरुन खाजगी केबल टाकण्याचा प्रयत्न करत असलेल्या कामगारांना वीजेचा जोरदार धक्का बसला आहे. यामध्ये एक कामगाराचा मृत्यू झाला आहे तर आणि एक कामगार जखमी आहे. पुण्यातील कोथरुड भागातील घटना ही घटना आहे. कुंडलीक लक्षमण शिंदे असे मृत कामगाराचे नाव आहे तर स्वप्नील बोडके असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. (Latest Marathi News)

Pune News
Badlapur News: बदलापूरकरांसाठी गुड न्यूज; थेट पनवेल अन् जेएनपीटी कनेक्टिव्हीटी मिळणार

स्थानिक नेटवर्कसाठी काम करणारे हे दोघे जण इमारत मालकाच्या परवानगीशिवाय दुपारी इमारतीच्या टेरेसवर चढले. टेरेसवरून महापारेषण कंपनीच्या १३२ केव्ही वाहिनीच्या तारेवरून फायबर ऑप्टीक केबल फेकण्याचा या दोघांनी प्रयत्न केला. परंतु सदर कंबल चालु वाहिनीच्या तारेवर पडली आणि त्यामुळे सदर लाईन ११:५१ वाजता ट्रिप झाली आणि त्या दोघांना विजेचा जोरदार धक्का बसला. (Pune News)

Pune News
Manipur Violence News: मणिपूरमधील हिंसाचार भडकला; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी दलाला दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

यामध्ये कुंडलीक लक्षमण शिंदे, वय ३१ वर्ष हे या घटनेत गंभीररित्या भाजल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी (Doctor) त्यांना मृत घोषित केले. दुसरी व्यक्ती स्वप्नील बोडके, हे ७५ टक्के भाजल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे यांच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला झाला आहे. शिंदे यांच्यामागे आई, पत्नी व दोन मुले आहेत. यातील एक मुलगा दिव्यांग आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com