Agriculture News : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; मुसळधार पावसानंतर कृषी विभागाचा खास सल्ला

Pune News : राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अनेक भागात तर मुसळधार पाऊस झाल्याने शेतांमध्ये देखील पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांची शेती तयार करण्याचे देखील रखडले आहे
Agriculture News
Agriculture NewsSaam tv
Published On

पुणे : राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान मान्सूनचे देखील लवकर आगमन होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आता लगबग सुरु आहे. काही शेतकरी मान्सूनचा पहिला पाऊस पडताच पेरणीच्या कामाला सुरवात करत असतात. मात्र लागलीच पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. 

राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अनेक भागात तर मुसळधार पाऊस झाल्याने शेतांमध्ये देखील पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांची शेती तयार करण्याचे देखील रखडले आहे. तर काही शेतकऱ्यांकडून शेती तयार करून झाली आहे. अर्थात मान्सूनचा पाऊस पडताच पेडणीची लगबग सुरु होणार आहे. मात्र अवकाळी पाऊस पडल्यानंतर देखील पेरणीची घाई न करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 

Agriculture News
Heavy Rain : गरिबीचा संसार, मोलमजुरी करून गाडा हाकतोय, पावसानं माती केली; पावसामुळे सडलेला कांदा पाहून शेतकरी महिलेचे अश्रू अनावर

वापसा येईपर्यंत शेतकऱ्यांनी थांबावे  
जिथे जास्त पाऊस झाला आहे. त्याठिकांच्या शेतकऱ्यांना थांबावं लागणार आहे. जोपर्यंत वापसा येत नाही; तोपर्यंत पेरणी करता येणार नाही. जिथे जास्त पाऊस झाला आहे, तिथे वापसा आल्यावर पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. दरम्यान मॉन्सून लवकर म्हणजे ११ दिवस आधी मॉन्सून दाखल झाला. परंतु राज्यात १४० मिलिमीटर मान्सून पूर्व पाऊस झाला. त्यामुळे वापसा होईपर्यंत शेतकऱ्यांनी थांबावं असा सल्ला कृषी विभागाने आज दिला आहे.

Agriculture News
Buldhana : ग्रामपंचायतीच्या आरओ फिल्टर एटीएमचे पाणी अशुद्ध; किनगावराजा गावात आजाराची साथ, जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेचा अहवाल

लवकरच नुकसानीचे पंचनामे करणार पूर्ण  

उन्हाळी हंगामातील पिकं, फळ पिकं काढणीला आले आहेत. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ३४ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झालेलं असून त्याठिकाणी पंचनाम्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनामा पूर्ण झाला की त्याचा संबंधित अहवाल राज्य शासनाला देण्यात येईल; अशी माहिती पुणे विभागाचे कृषी संचालक र. शा. नाईकवाडी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com