Pune News: धूलिवंदनाच्या दिवशीच इंद्रायणी कोपली! नदीपात्रात बुडून एकवीस वर्षीय युवकाचा मृत्यू

Pune News: आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील आठ विद्यार्थी धूलिवंदन खेळले. त्यानंतर सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले.
A youth drowned in Indrayani river
A youth drowned in Indrayani riversaam tv

Pune News: धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी इंद्रायणीकाठी गेलेल्या एकवीस वर्षीय युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. जयदीप पुरुषोत्तम पाटील असे या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जळगाव येथील रहिवाशी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील आठ विद्यार्थी धूलिवंदन खेळले. त्यानंतर सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले. दरम्यान जयदीप पाटील याचा पाय घसरला आणि तो नदीपात्रात पडून खोल पाण्यात बुडाला.

A youth drowned in Indrayani river
Beed News: गाढवावरून जावयाची मिरवणूक काढण्याच्या परंपरेला गालबोट, बीडच्या विडा गावात दोन गटात तुफान हाणामारी

या घटनेनंतर जयदीपच्या मित्रांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रणजित सावंत आंनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)

A youth drowned in Indrayani river
Viral Video : महाराष्ट्राचा बिहार झालाय? ही गौतमीपेक्षा भारी; मयुरीचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या उलट सुलट प्रतिक्रिया

दोन तासाच्या अथक शोधमोहिमेनंतर बुडालेल्या जयदीपचा मृतदेह सापडला. बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. याप्रकरणी अधिक तपास तळेगाव पोलीस करीत आहेत. (Pune news)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com