Viral Video : महाराष्ट्राचा बिहार झालाय? ही गौतमीपेक्षा भारी; मयुरीचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया

राज्यात डान्सर गौतमी पाटील आणि तिच्या सहकारी डान्सर मैत्रिणींनी धुमाकूळ घातला आहे.
mayuri utekar viral vidoe
mayuri utekar viral vidoeSaam tv

Lavani Dancer Viral Video : राज्यात डान्सर गौतमी पाटील आणि तिच्या सहकारी डान्सर मैत्रिणींनी धुमाकूळ घातला आहे. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोच्या संख्येत तरुणाई गर्दी करते. लावणी डान्सरला गौतमीला कमी कालावधित अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. लावणी डान्सर गौतमी चर्चेत असताना आणखी एक डान्सर चर्चेत आली आहे. मात्र, ही डान्सर नेटकऱ्यांच्या टीकेची धनी ठरली आहे. (Latest Marathi News)

लावणी (Lavani) डान्सर सध्या तरुणांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या चर्चेत असलेल्या गौतमीचा डान्स पाहायला गावा-गावातून लोक हजेरी लावत आहेत. गौतमीच्या कार्यक्रमाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गौतमी स्टेजवर नाचत असताना तरुणाई देखील बेफाम नाचताना दिसते.

मात्र, गौतमीच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दीमुळे गोंधळ उडाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. कित्येकदा गौतमीला पोलिसांच्या वाहनातून योग्यस्थळी जावं लागतं. तरुणांमध्ये लावणी डान्सरची क्रेझ वाढत असताना दुसरीकडे लावणी डान्सरना टीकेची धनी व्हावे लागत आहे. काही लोकांकडून गौतमीवर देखील टीका केली जाते. याचदरम्यान, आता लावणी डान्सर मयुरी उतेकर चर्चेत आली आहे.

एका कार्यक्रमातील डान्स मयुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. मयुरीला तिचा डान्सचा रील्स व्हिडिओ शेअर करणं चांगलचं महागात पडलं आहे. नेटकऱ्यांनी मयुरीला तिच्या डान्सवरून ट्रोल केले आहे.

एका युजरने म्हटले आहे की, 'महाराष्ट्राचा (Maharashtra) हळूहळू बिहार होऊ लागला आहे'. तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'महाराष्ट्र थोड्या दिवसात बिहार होईल, तसा झालाच आहे, तरी नशीब बंदुका घेऊन फिरत नाहीत'. तर आणखी एका युजरे म्हटले की, सर्व पोरी आता सपना चौधरी सारख्या स्टेजवर उड्या मारायला लागल्या आहेत'. नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला मयुरी काय उत्तर देणार, हे पाहावे लागणार आहे.

mayuri utekar viral vidoe
Gautami Patil Photos : 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम...';अख्या महाराष्ट्रात गौतमी पाटीलचा जलवा

कोण आहे मयुरी उतेकर ?

मयुरी उतेकर लावणी डान्सर आहे. मयुरी ही रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये राहते. मयुरीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. मयुरीचे इन्टाग्रामवर ८० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. मयुरीचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. मयुरीच्या फोटो आणि व्हिडिओवर प्रतिक्रियांचा वर्षाव होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com