Beed News: गाढवावरून जावयाची मिरवणूक काढण्याच्या परंपरेला गालबोट, बीडच्या विडा गावात दोन गटात तुफान हाणामारी

Beed News: गेल्या 90 वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे गावकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
Beed News
Beed NewsSAAM TV

Beed News: बीडमधील विडा गावात दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. गेल्या 90 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. मात्र यंदा या परंपरेला गालबोट लागले आहे. यंदा विडा गावात जावयाची मिरवणूक सुरु असताना दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. गेल्या 90 वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे गावकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Beed News
Viral Video : महाराष्ट्राचा बिहार झालाय? ही गौतमीपेक्षा भारी; मयुरीचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या उलट सुलट प्रतिक्रिया

मिरवणुकीत नाचताना किरकोळ कारणावरून दोन गटात आधी बाचाबाची झाली, नंतर हातापायी आणि दगडाने मारहाणीपर्यंत हा वाद गेला. मात्र गावातील महिला आणि इतर ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला आणि मोठा अनर्थ टळला. यामुळे मिरवणूक सुरू असताना काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Beed News)

Beed News
Dhulivandan 2023 : प्रेम विवाह करणाऱ्या जावयाची पहिल्यांदाच गावातून वाजत गाजत मिरवणूक (पाहा व्हिडिओ)

विडा गावातील ही परंपरा राज्यभरात प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी लाडक्या जावयाला गाढवावर बसून मिरवणूक काढली जाते. या मिरवणूकीत अख्ख गाव सहभागी होतं. यात महिलाही मागे राहत नाहीत. यंदा विडा गावाचे जावयी असलेले अविनाश करपे यांना या मिरवणुकीचा मान मिळाला होता. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेचा जावई देखील हसत हसत स्विकार करतात. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com