Pune Mhada Lottery: पुणे म्हाडा घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; शेवटची तारीख काय?

Mhada Lottery: म्हाडाच्या सोडतीमध्ये ७ मार्चपासून नोंदणी अर्ज करण्यास सुरुवात झाली. वाढीव कालावधीनुसार, आता ३० मेपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहे.
Pune Mhada Lottery
Mhada Lottery Saam Tv

Pune :

पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील ४ हजार ७७७ सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाने याबाबत निर्णय घेतला आहे.

Pune Mhada Lottery
Pune Breaking: रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगा; पुण्यातील प्रसिद्ध 'पब'वर पोलिसांची धडक कारवाई, २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय?

म्हाडाच्या सोडतीमध्ये ७ मार्चपासून नोंदणी अर्ज करण्यास सुरुवात झाली. वाढीव कालावधीनुसार, आता ३० मेपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहे. म्हाडा योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दोन हजार ४१६ सदनिका आहेत.

कुठे किती सदनिका?

म्हाडाच्या विविध योजनेतील १८ सदनिका देण्यात आल्यात. म्हाडा पीएमएवाय योजनेत ५९ सदनिका आहेत. पीएमएवाय खासगी भागीदारी योजनेमध्ये ९७८ सदनिका. तर २० टक्के योजनेतील पुणे महापालिकेमध्ये ७४५ सदनिका देण्यात आल्या आहेत. तसेच २० टक्के योजनेतील पिंपरी-चिंचवडमध्ये ५६१ सदनिका आहेत.

अर्ज कसा करायचा?

  • म्हाडा घरांसाठी अर्ज करताना सर्वात आधी lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • पुढे तुम्हाला मुख्यपृष्ठावर पुणे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह (FCFS) हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

  • त्यानंतर housing.mhada.gov.in अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला आयडीवरील (पॅन कार्ड) माहिती टाकून लॉगइन करावे लागेल.

  • पुढे लॉटरी अर्ज फॉर्म फील्डमध्ये नाव, पत्ता, संपर्क क्रमांक असे काही कॉलम दिसतील ही सर्व माहिती भरून घ्या.

  • पुढे तुम्हाला अर्ज सबमिट करण्यासाठी काही कागदपत्रे विचारली जातील ती अपलोड करा.

  • नंतर नोंदणी शुल्क प्रक्रिया पूर्ण केल्यावर सबमिटवर क्लिक करा.

Pune Mhada Lottery
Maharashtra Politics 2024 : विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम नॉटरिचेबल?; नाराजीवरून नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com