Pune Breaking: रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगा; पुण्यातील प्रसिद्ध 'पब'वर पोलिसांची धडक कारवाई, २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Police Crime Branch Action: रात्री उशिरापर्यंत सुरू असल्यामुळे पुणे पोलिसांनी शहरातील दोन प्रसिद्ध पबवर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २८ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
pune crime
pune policesaam tv
Published On

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

Pune Crime News

रात्री उशिरापर्यंत सुरू असल्यामुळे पुणे (Pune) पोलिसांनी शहरातील दोन प्रसिद्ध पबवर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २८ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुण्यातील 'एलरो' आणि 'युनिकॉर्न हाऊस' या दोन नामांकित पब्सवर (Pune Crime) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.   (Latest Marathi News)

रात्री १.३० नंतर सुद्धा डी जे वाजवून आस्थापना चालू ठेवत असल्यामुळे गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी साऊंड सिस्टिम, (Crime News) हुक्का पॉट यासह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही पबमधून पोलिसांनी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त आहे. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील सगळ्या हॉटेल आणि पब, बार यांना आस्थापना सुरू (Pune Crime News) ठेवण्यासाठी रात्री १.३० पर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत एलरो आणि युनिकॉर्न हाऊस ( Elro and Unicorn House Pubs) हे दोन्ही पब रात्री १.३० नंतर देखील सुद्धा सर्रास सुरू होते.

भल्या मोठ्या डीजे साऊंड सिस्टिमने नागरिक हैराण होत असल्याच्या तक्रारी सुद्धा पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ पब सुरू असल्याचं निदर्शनास आलं (Police Raid) होतं. या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल रात्री उशिरा कारवाई केली आहे. पुणे पोलीस गुन्हेगारी कमी करण्यासाठी सातत्याने उपक्रम राबवित आहेत.

pune crime
Pune Police: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांची मोठी कारवाई; एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार तडीपार

अमन शेख, संदीप सहस्रबुद्धे, रश्मी कुमार, (Pune Police Crime Branch) सुमित चौधरी आणि प्रफुल गोरे या पब मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यातील हे दोन्ही नामांकित पब आता पोलिसांकडून सील करण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरातील पब, बार, रुफ टॉप हॉटेल यांना रात्री दीड पर्यंतची वेळ मर्यादा ठरवून दिलेली आहे. आता पोलीस आयुक्तांच्या या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या (Pune Police) दोन पब हाऊसला पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पहाटेपर्यंत विना परवाना डीजे वाजवल्यामुळे पुणे शहरातील दोन पब सील करण्यात आले आहेत.

pune crime
Pune Police: पुण्यातील 85 'VIP' राजकारण्यांची सुरक्षा काढली; पुणे पोलीस आयुक्तांचा निर्णय, काय आहे कारण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com