संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक; शेतकरी विकास पॅनलचं निर्विवाद वर्चस्व, महत्त्वाची उद्दिष्टे काय?

Sant Tukaram Sugar Factory Election : श्री. संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलने प्रचंड मतांनी विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. कारखान्याचा सर्वांगीण विकास, ऊस उत्पादकांच्या समस्या सोडवणे ही उद्दिष्टे असणार आहेत.
Maval Sant Tukaram Sugar Factory Elections
Maval Sant Tukaram Sugar Factory ElectionsSaam Tv News
Published On

दिलीप कांबळे, साम टीव्ही

पुणे : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय श्री. संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलनं जोरदार विजय मिळवत तिन्ही जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, दत्तात्रय जाधव आणि चेतन भुजबळ हे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

कोणाला किती मते?

नानासाहेब नवले : ८५२४ मते

दत्तात्रय जाधव : ८३८० मते

चेतन भुजबळ : ७१८९ मते

अपक्ष बाळासाहेब भिंताडे : २५०५ मते

एकूण वैध मतपत्रिकांची संख्या : ९५१५

अवैध मतांची संख्या : ११२

Maval Sant Tukaram Sugar Factory Elections
गिरीश महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध, एकनाथ खडसे यांचे सनसनाटी आरोप; भाजपचे संकटमोचक म्हणतात...

या निवडणुकीत श्री. संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलने प्रचंड मतांनी विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. नूतन संचालक मंडळासमोर कारखान्याचा सर्वांगीण विकास, ऊस उत्पादकांच्या समस्या सोडवणे व पारदर्शक कारभार ही महत्त्वाची उद्दिष्टे असणार आहेत.

दरम्यान, श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील २१ जागांपैकी गट क्रमांक एक ताथवडे-हिंजवडी गटातील तीन जागांकरिता झालेल्या काल झालेल्या मतदानासाठी मतदारांनी निरुत्साह दाखविला. मुळशी, मावळ, खेड, हवेली आणि शिरुर या पाच तालुक्यातील २२,२५८ मतदारांपैकी फक्त ९५४६ (४२.८९ टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला. सर्वात कमी मतदान लोणावळा येथील ४५८ पैकी ८५ (१४.१९ टक्के) मतदारांनी मतदान केलं. तर सर्वात जास्त इंदोरी येथील मतदान केंद्रावरील ३३८ पैकी ३०० (८८.७६ टक्के) मतदान केलं.

मतमोजणी आज रोजी द्रौपदा लॉन्स कार्यालय हिंजवडी डांगे चौक रोड येथे सकाळी ९ वाजता झाली. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी १८ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरित तीन जागेसाठी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले, दत्तात्रय जाधव, बाळासाहेब भिंताडे, चेतन भुजबळ असे चार उमेदवार रिंगणात होते. मावळ तालुक्यातील मतदान केंद्रनिहाय एकूण मतदान आणि कंसात झालेलं मतदान १) तळेगाव दाभाडे - ७५४ (२०२), २) कार्ला - ११७ (२९). ३)सोमाटणे - ३८४ (१४२), ४) चांदखेड - ४३२ (२१९), ५) वडगाव मावळ - ३०८ (१४०), ६) इंदोरी - ६७७ (४८३), ७) उर्से - ५७३ (१९१), ८) काले कॉलनी- १००९ (५२४), ९) लोणावळा - ४५८ (६५), १०) दारुंब्रे - ६२८ (३७२), ११) कामशेत -६२२ (२१३).

Maval Sant Tukaram Sugar Factory Elections
Manikrao Kokate: काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटेंचा माफीनामा|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com