
संजय महाजन, साम टीव्ही
जळगाव : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद सर्वश्रुत परिचित आहे. अशातच 'गगनभेदी'चे पत्रकार अनिल थत्ते यांच्या व्हायरल क्लिपचा पुरावा देत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलं आहे. महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. त्यासोबतच यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांना भेटून यासदंर्भात विचारणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, एका पत्रकाराने आपली क्लिप प्रकाशित केली. त्यात असं म्हटलं आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. तिचे नाव मला माहित आहे. पण ते सांगणं उचित राहणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. अमित शाह यांच्याकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चर्चा झाली. त्यावेळेस अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना बोलावून घेतलं होतं. त्यांना सांगितलं की, महिला IAS अधिकाऱ्याशी तुमचे संबंध आहेत. यावेळी महाजनांनी सांगितलं की, नाही, माझे अनेकांशी कामानिमित्त संबंध आहेत. कामानिमित्त मी बोलतो. अमित शाह यांनी त्यांना सांगितलं की, तुमचे कॉल डिटेल्स रिपोर्ट आमच्याकडे आहेत. रात्री एक वाजेनंतर दिवसभरात शंभर शंभर कॉल तुमचे झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही आता काहीही सांगा. पण, तुमचा सीडीआर खरं बोलतो. रोज बोलण्याचं काय कारण आहे? असे प्रश्न त्या पत्रकाराने शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले', असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मला वाटते की, खरोखर गिरीश महाजन यांचे १० वर्षाचे सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. गिरीश महाजनांच्या रंगलेल्या रात्री थत्तेंनी म्हटल्याप्रमाणे मी देखील अमित शाहांना भेटणार आहे. अमित शाह आणि माझी भेट होतच राहते. त्यावेळी मी त्यांना विचारणार आहे की, हे खाली जे चाललं आहे ते काय आहे? असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. आता एकनाथ खडसे यांच्या आरोपावर गिरीश महाजन काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गिरीश महाजनांनी आरोप फेटाळले
दरम्यान, एकनाथ खडसेंनी पत्रकाराचे पुरावे देत गिरीश महाजनांवर जे आरोप केले होते, ते त्यांनी फेटाळले आहेत. महाजन म्हणाले की, कशासासाठी लोकांची दिशाभूल करताय, काही असेल तर त्यांनी दाखवावं. मी जर एक गोष्ट सांगितली तर लोकं यांना बाहेर निघाल्यावर जोड्यांनी मारतील. मी त्यांच्याएवढा खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. कुठल्या तरी गोष्टीचा एकतरी पुरावा त्यांनी द्यावा, गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार घाणेरडी भाषा करायची, घाणेरडं वक्तव्य करायचं, कमरेखालची भाषा करायची. काहीही सिद्ध करता येत नाही, आरोप करता येत नाही. त्यामुळे फक्त ते चारित्र्यहरण करतात, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही. माझं त्यांना आव्हान आहे की, त्यांनी एक पुरावा दाखवावा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल, असं म्हणत गिरीश महाजनांनी आरोपांचं खंडण केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.