Pune Court Scam: बोगस न्यायनिवाड्यात अध्यक्षांचे चौकशीचे आदेश

Nana Patole: साम टीव्हीच्या धक्कादायक बातमीचे विधानसभेत पडसाद उमटले. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी न्यायव्यवस्थेला हादरवणाऱ्या या प्रकरणावर सभागृहात आवाज उठवला.
Pune Court Scam
Pune Court Scamsaam tv
Published On

अक्षय बडवे/साम टीव्ही न्यूज

न्यायव्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या सामच्या बातमीचे विधानसभेतही पडसाद उमटलेत. काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी साम टीव्हीनं उघडकीस आणलेल्या बातमीचा विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. खोटं निकालपत्र तयार करण्याची हिंमतच कशी होते असा सवाल त्यांनी यावेळी विधानसभेत विचारला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी चौकशी करुन दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश सरकारला दिलेत. काय घडलंय बोगस न्यायनिवाडा प्रकरणी पाहूया.

मात्र तरीही खोटी सही करून न्यायालयाची दिशाभूल करणारे आरोपी अजूनही मोकाट कसे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. याप्रकरणीही साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत.

- आरोपी मोकाट, कारवाई कधी?

- न्यायाधीशांची खोटी सही करणारे आरोपी कोण?

- थेट न्यायाधीशांचे खोटं निकालपत्र आणि खोटी सही करणारे आरोपी मोकाट

- बनावट सही केल्याप्रकरणी पुणे पोलिसात गुन्हा दाखल नाही

Pune Court Scam
Maharashtra Politcs: रोहिंगे महाराष्ट्राचे नागरिक? रोहिंग्यांची राज्यात घुसखोरी

दरम्यान पुणे न्यायालय जबाबदारी मुंबई उच्च न्यायालयावर ढकलतंय तर मुंबई उच्च न्यायालयाच्या जामिन रद्द करण्यावर पोलिसही कारवाई करायला तयार नाही. एकंदरीत काय आळी मीळी गुप चीळी.

Pune Court Scam
Bhiwandi: शिवरायांचं पहिलं मंदिर भिवंडीत, अखंड कृष्णशीळेतून साकारली महाराजांची मूर्ती

दरम्यान 5 मार्च रोजी जेव्हा ही धक्कादायक बाब उजेडात आली, त्यावेळी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींचा जामीन रद्द केला. या बनावट अर्जाची दखल घेत उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती शिवकुमार दिघेंनी आरोपींचा जामीन रद्द करत याबाबत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलेत. मात्र तरी पुणे पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दुसरीकडे आरोपींना विमानतळ पोलिसांनी अटक का नाही केली असा प्रश्न सुद्धा आता संबंधित प्रकरणातील वकील अँड प्रशांत पाटील यांनी उपस्थितीत केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com