Crime : सोनं सांगून पितळेचे दागिने विकले, पुण्याच्या दाम्पत्याने नागपूरकराला फसवलं, कसा झाला भंडाफोड?

Nagpur crime News : नागपूरमध्ये पुण्यातील दाम्पत्याने सोने सांगून पितळेचे दागिने विकले; १५ लाखांची फसवणूक. पोलिसांनी आरोपींना अटक करून ७ लाख रुपये जप्त केले.
Pune couple cheats Nagpur woman, fake gold jewelry fraud
Pune couple cheats Nagpur woman, fake gold jewelry fraudSaam TV News
Published On

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Pune couple cheats Nagpur woman, fake gold jewelry fraud : सोनं सांगून पितळेचे दागिने विकल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघड झाली आहे. पुण्यातील दाम्पत्याने नागपूरमधील एका दुकानदाराला फसवल्याचे समोर आलेय. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी पुण्याच्या दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहे. गणेश काशी आणि शांती काशी यांनी नागपूरमधील सरला अग्रवाल यांची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

सोने खाणीत सापडले आहे, बाहेर विकता येत नाही, अशी बतावणी करत काशी दाम्पत्याने अग्रवाल यांची फसवणूक केली. काशी यांनी अग्रवाल यांना पितळेचे दागिने १५ लाखांत विकले. पण अग्रवाल यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले, त्यानंतर नागपूर पोलिसांनी तपास करत काशी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या.

Pune couple cheats Nagpur woman, fake gold jewelry fraud
Pune : पुणेकरांनो नोटा बघून वापरा! बनावट नोटांच्या रॅकेटचा भंडाफोड, २८ लाखांच्या डुप्लिकेट नोटा जप्त

खाणीत सोने सापडल्यानं सराफाकडे विक्री करता येत नसल्याची काशी दाम्पत्याने बतावणी केली. त्यांनी सरला अग्रवाल यांची १५ लाखांनी फसवणूक केली. गणेश काशी त्याची पत्नी शांती काशी असे पुण्यातून अटक केलेल्याची नावे आहेत. नागपूरमधील नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपी दाम्पत्याला पुणे येथून अटक केली. त्यांच्याकडून ७ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. नागपुरात फसवणूक झालेल्या सरला अग्रवाल ह्या इतवारी परिसरात रजाई भंडार या नावाने दुकान आहे.

Pune couple cheats Nagpur woman, fake gold jewelry fraud
Mhada home : दिवाळीआधी म्हाडाचा धमाका; मुंबईतील ३ ठिकाणी ६००० स्वस्त घरांची लॉटरी

आरोपी काशी दाम्पत्य सरला अग्रवाल ह्यांच्या दुकानात गेले. त्यांच्याकडून बेडशीट खरेदी केली. घरी गेल्यानंतर बेटशीट परत करण्याच्या बहाण्याने पुन्हा दुकानात गेले. त्यांच्याशी ओळख करून घेतली. खाणीत सोने सापडले, सराफाकडे विक्री करायला जाऊ शकत नाही. अलीकडेच मुलीचे लग्न आहे. आम्हाला पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे कमी पैशांत दागिने विकत आहे असे सांगून विश्वास संपादन केला.

Pune couple cheats Nagpur woman, fake gold jewelry fraud
Mumbai News : मुंबईत १९ इमारतींचा पुनर्विकास, एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील रहिवाशांना त्याच ठिकाणी घरं मिळणार

मुलीचे लग्न असल्याचे सांगत काशी दाम्पत्यांनी सरला अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला. आधी विश्वास बसावा म्हणून आरोपीने फिर्यादी यांना चार सोन्याचे मनी दिले. त्यांनी सराफा व्यापाऱ्याकडून तपासणी केली ते सोन्याचे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे फिर्यादी सरला अग्रवाल यांचा आरोपींवर विश्वास बसला. त्यानंतर मात्र १५ लाखांत सौदा पक्का केला. त्यावेळी मात्र ते दागिने पितळेचे असल्याचे उघड झाले. त्यांनी लगेच नंदनवन पोलिस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना अटक केली. आरोपी काशी दाम्पत्याला पुण्यातून अटक केली. नंदनवन पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com