80 हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले...!

अटकपुर्व जामीन रोखण्यासाठी 80 हजारांची लाच घेतांना, बीडच्या अंभोरा पोलीस (Ambhora Police Station) ठाण्यातील PSI ला रंगेहात पकडण्यात आले आहे.
80 हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले...!
80 हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले...!विनोेद जिरे
Published On: 

बीड: अटकपुर्व जामीन रोखण्यासाठी 80 हजारांची लाच घेतांना, बीडच्या अंभोरा पोलीस (Ambhora Police Station) ठाण्यातील PSI ला रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई बीड व औरंगाबाद (Beed) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department), काल 26 जुलै रोजी सायंकाळी केली आहे. राहुल पांडुरंग लोखंडे (Rahul Lokhande) असे लाचखोर पीएसआयचे नाव आहे. सध्या ते बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या अंभोरा पोलीस ठाण्यात पीएसआय म्हणून कार्यरत आहेत.

पीएसआय लोखंडे यांनी एका तक्रादाराकडून, गुन्ह्यात मंजूर असलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रद्द न करण्यासाठी, तसेच गुन्ह्यातील वाहने जप्त न करण्यासाठी, एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

80 हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले...!
आमदार पुत्रांच्या लग्नाला नागरिकांसह आमदार खासदारांची तोबा गर्दी

त्यानंतर तडजोडी अंती 80 हजारांची लाच घेताना, बीड व औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुल लोखंडेला रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या कारवाईने लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com