PM मोदींकडून DY चंद्रचूड यांच्या गणरायाची आरती; सरन्यायाधिशांचं चुकलं काय? कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी थेटच सांगितलं

Legal expert Ulhas Bapat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश यांच्या घरी जाऊन गणरायाची आरती केली. मात्र यावरुन देशातील राजकारणातून विरोध टीका होऊ लागलीय. यावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत व्यक्त केलंय.
PM मोदींकडून DY चंद्रचूड यांच्या गणरायाची आरती; सरन्यायाधिशांचं चुकलं काय? कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी थेटच सांगितलं
Legal expert Ulhas Bapat
Published On

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

देशभरात सध्या गणेशोत्सवाचा जल्लोषात साजरा केला जात आहे. सिनेसृष्टीतील सेलिब्रेटी,राजकीय नेतेमंडळींनी आपल्या घरी गणपती बाप्पा आणले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीमधील घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन त्याच्या घरातील गणपती बाप्पाची आरती केली. पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने पंतप्रधान मोदीनी गणरायाची पूजा केली.या पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत, मात्र त्यांच्या या पूजेवरून विरोधकांनी पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांच्यावर टीका केली. त्यानंतर भाजपकडून त्या टीकेला जोरदार उत्तर देण्यात आले.

PM मोदींकडून DY चंद्रचूड यांच्या गणरायाची आरती; सरन्यायाधिशांचं चुकलं काय? कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी थेटच सांगितलं
PM Modi Ganpati Puja: सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी! मराठमोळ्या पद्धतीने केलं गणरायाचे पूजन; पाहा VIDEO

पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांनी गणरायाची पूजा करणं चुकीचं आहे का? सरन्यायाधीशांची चुकी झाली आहे का? यावर चर्चा सुरू झालीय. सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधानांनी गणेशाची आरती केल्याची ही पहिलीच घटना आहे. यावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केली. त्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. सरन्यायाधीशांचं हे चुकलं आहे का यावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी थेटपणे आपलं मत व्यक्त केलंय.पंतप्रधान आणि सरन्यायाधीश दोन्ही घटनेचे पद आहेत. घटनेच्या अनेक तत्वांना आता तिलांजली दिली जातेय. घटनेत सगळ्याच गोष्टी लिहल्या नसतात, घटना उत्क्रांत होत गेलेली असते. प्रसिध्दी पासून न्यायाधीशांनी दूर राहावं असं म्हणलं आहे पण याकडे दुर्लक्ष झालं आहे असं बापट म्हणाले.

सरन्यायाधीशांनी पंतप्रधान यांना बोलावलं असेल तर ही चूक आहेच, दुसऱ्या बाजूला मात्र जर पंतप्रधान आपण हून त्यांच्याकडे गेले असतील सरन्यायाधीश यांनी अशी भेट चुकीची आहे हे सांगायला पाहिजे. लोकशाही सुदृढ करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि सर न्यायाधीशांवर असते आणि असं काही होत असेल तर ही चूक झाली आहे असं ही बापट म्हणाले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी जात श्रीगणेशाची पूजा केली. पीएम मोदींनी इन्स्टाग्रामवर एक फोटोदेखील पोस्ट केला. यात ते सरन्यायाधीशांसोबत गणरायाची पूजा करताना दिसत आहेत. मात्र पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी पोहोचणे विरोधकांना आवडत नसून त्यांनी त्यांच्यावर टीका केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com