रस्त्याच्या अभावी गरोदर महिलेची मरण यातना

जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा गावच्या ग्रामस्थाना अजूनही रस्ता मिळाला नाही. जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा या गावात आदिवासी लोकवस्ती असणाऱ्या गावाला स्वातंत्र्या नंतर पक्का रस्ता नसल्याने, गेल्या अनेक वर्षा पासून येथील गावकरी स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी अर्ज निवेदन सादर करुन, सुध्दा जाग येत नाही.
रस्त्याच्या अभावी गरोदर महिलेची मरण यातना
रस्त्याच्या अभावी गरोदर महिलेची मरण यातनाराजेश काटकर
Published On

राजेश काटकर

परभणी : जिंतूर Jintur तालुक्यातील पिंप्राळा Pimprala गावच्या ग्रामस्थाना अजूनही रस्ता मिळाला नाही. जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा या गावात आदिवासी Tribal लोकवस्ती असणाऱ्या गावाला स्वातंत्र्या नंतर पक्का रस्ता नसल्याने, गेल्या अनेक वर्षा पासून येथील गावकरी स्थानिक प्रशासनाला administration वेळोवेळी अर्ज निवेदन सादर करुन, सुध्दा जाग येत नाही. गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे, उघड झाले आहे. 29 जून दिवशी संध्याकाळी 9 वाजेच्या सुमारास गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत असल्यामुळे, रस्ता नसल्याने ३ किलोमीटर पाई घेऊन जावे लागले आहे. Pregnant women faces problem of bad roads

हे देखील पहा-

माळरानावरच प्रसूती होते, की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पत्रकाराच्या journalist मदतीने तिला सुखरूप पणे दवाखान्यात hospital दाखल करण्यात आले आहे. अजून किती दिवस गावकऱ्यांना मरण यातना सोसाव्या लागतील, हे न उलगडणारे कोडे झाले आहे. पिंप्राळा गावातील मीरा शेकुराव गायकवाड(वय- २७) रा.गणेशपूर ता.सेनगाव येथील राहणारी असून, पिंप्राळा हे तिचे माहेर आहे. माहेरात बाळंतपनासाठी ही महिला आली होती.

विशेष म्हणजे तिचे पहिले बाळंतपण अशाच पद्धतीने याच माळरानावर झाले आहे. दरम्यान पत्रकार रत्नदीप शेजावळे हे याच गावाशेजारी असणाऱ्या, बेलखेडा येथे रस्ता अडविल्या प्रकरणा संदर्भात शेतकऱ्याशी farmer चर्चा करण्यासाठी गेले होते. रात्रीच्या सुमारास महिला ही 3 किमी अंतर चालुन माळरानावर गाडी अभावी ताटकळली असल्याचे, समजल्यानंतर सहकारी माधव घोगरे यांना सोबत घेऊन मदतीसाठी धावून गेले. Pregnant women faces problem of bad roads

रस्त्याच्या अभावी गरोदर महिलेची मरण यातना
पतीच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर महिलेची मुलासह आत्महत्या

तिथून फेसबुक Facebook लाईव्ह Live केल्यानंतर क्षणार्धात आमदार मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार शेजावळे यांना कॉल Call करून घटनास्थळी असणाऱ्या महिलेला तात्काळ मदत करा, मी जालना रोड दरम्यान जिंतूरकडे प्रवासात आहे. मला लोकेशन द्या मी स्वतः गाडी घेऊन माझी पोहचते असे कळविले. मात्र, वेळेवर बेलखेडा येथील स्थानिक तरुण माजीद पठाण याने स्वतःच्या चारचाकी वाहणातुन त्या महिलेला सुरक्षितपणे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

यावर मेघना बोर्डीकर यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन, घटनेचे गांभीर्य ओळखून भेट दिली आहे. उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून, महिलेची प्रक्रुती स्थिर असल्याची कळविले आहे. एकंदरीत एवढया गंभीर प्रकाराकडे पाहता आपण आजही ग्रामीण Rural भागातील नागरिकांचे रस्त्या अभावी हाल होत असल्याचे, सिद्ध होत आहे. राजकीय पुढारी केवळ निवडणुकी पूर्वतेच आश्वासने देत असतात, यावरून दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून, दिलासा द्यावा अशी मागणी गावकरी करत आहे. Pregnant women faces problem of bad roads

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com