

Parbhani Police News : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. त्यामुळे पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)
प्रशांत दीपक (वय 38) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ही घटना परभणीच्या पूर्णा शहरात घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली आहे याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.
परभणीच्या पूर्णा शहरातील सिद्धार्थ नगर येथे राहणारे प्रशांत दीपक (Police Constable Prashant Deepak) हे गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होते. बारा वर्षांपूर्वी ते पोलीस दलामध्ये दाखल झाले होते. सोमवारी नियमितपणे त्यांनी गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आपले कर्तव्य बजावले आणि सायंकाळच्या सुमारास घरी आले.
मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत ते खोलीतून बाहेर न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची खोली उघडली. दारातून आत पाहताच कुटुंबियांना माेठा धक्का बसला. प्रशांत दीपक यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर नातेवाईकांनी या घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मदेव गावडे, पोलीस निरीक्षक सुभाष गावडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केला. पोलीस कर्मचारी प्रशांत दीपक यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली आहे याचे कारण मात्र अस्पष्टच आहे. त्यांच्या आत्महत्येने पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात वडील,पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.