Chiplun News: 'उद्धव ठाकरेंची अवस्था विक्रम वेताळ सारखी, संजय राऊत त्यांच्या मानगुटीवर'

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा रस्ता भटकविण्याचे काम केले.
Uddhav Thackeray, pramod jathar, sanjay raut
Uddhav Thackeray, pramod jathar, sanjay rautsaam tv

- जितेश काेळी

Uddhav Thackeray News : भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार (pramod jathar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) व खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर चिपळूण (chiplun) येथे माध्यमांशी संवाद साधताना जोरदार टीका केली आहे. नैसर्गिक युतीत म्हणजेच शिवसेना (shivsena) आणि भाजप (bjp) युतीत व्यवस्थित राहिले असते तर सुरळीत कामकाज चालू राहिले असते असे जठार यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Uddhav Thackeray, pramod jathar, sanjay raut
Video : 'भास्कर जाधव नाक्यावरचा लुक्का'; निलेश राणेंची शिवराळ भाषेत टीका

जठार म्हणाले उद्धव ठाकरेंची अवस्था विक्रम वेताळ सारखी झाली आहे. वेताळाने विक्रमाकडून पाप करुन घेतले तसेच सातत्याने राऊत सारख्या मंडळींनी केले. उद्धव ठाकरेंना काम करुनच दिलं गेले नाही असा टोला संजय राऊतांवर प्रमोद जठार यांनी लगावला आहे.

Uddhav Thackeray, pramod jathar, sanjay raut
Jalna Accident News : जालना- अंबड महामार्गावर यात्रा स्पेशल बसला अपघात, 30 प्रवासी जखमी

ज्या ध्येयाने, निष्ठेने ज्या हिंदु धर्माची पताका घेऊन चालला हाेता. तीच पताका बाजूला ठेवली गेली. हिंदुदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी बराेबर कधीच हातमिळवणी करणार नाही असा निर्धार केला हाेता. परंतु या सर्वांनी त्यांचे विचार बाजूला ठेवले हेच माेठं पाप केले अशी टीका जठार यांनी उद्धव ठाकरेंवर (uddhav thackeray) केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com