Prakash Ambedkar : अमली पदार्थांमधून आलेला पैसा कुठे जातो? प्रकाश आंबेडकर यांनी थेट पुरावेच देत केला गौप्यस्फोट

Prakash Ambedkar On Narcotics : पुणे-नाशिक पट्ट्यातील अमली पदार्थांचं कनेक्शन गोल्डन ट्रँगलशी आहे. तसंच अमली पदार्थांमधून आलेला पैसा लष्कर-ए-तोयबाला पुरवला जात असल्याची माहिती NIA ने दिली आहे,असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSaam Digital

पुणे नाशिक पट्ट्यात अमली पदार्थांच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यावरून आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर निशाणा साधला आहे. नाशिक ते लोणावळा पट्ट्यात अनेक ठिकाणी अमली पदार्थ सप्लाय करणाऱ्या ठिकाणांची माहिती असतानाही त्याच्यावर कारवाई केली जात नाही, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पुणे-नाशिक पट्ट्यातील अमली पदार्थांचं कनेक्शन गोल्डन ट्रँगलशी आहे. तसंच अमली पदार्थांमधून आलेला पैसा लष्कर-ए-तोयबाला पुरवला जात असल्याची माहिती NIA ने दिली आहे,असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. पोर्ट ब्लेअर बंदरावर १८ हजार कोटीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. मुंब्रा येथे १० हजार कोटीचा साठा जप्त केला होता. मात्र त्याची नोंद कोणत्याचं तपास यंत्रणेकडे नसल्याच गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

म्यानमार, थायलंड आणि लाओसच्या सीमा जीथे एकत्र येतात, त्याला गोल्डन ट्रँगल म्हटलं जातं. जगातील सर्वात मोठा अमली पदार्थ तस्करीचा प्रदेश म्हणून याची ओळख आहे. इथून भारताची पूर्वेकडची सीमा जवळ आहे. त्यामुळे पूर्वेकडच्या राज्यामधून अमली पदार्थ आणले जातात आणि भारतातच्या इतर राज्यांमध्ये सप्लाय केले जातात. त्यात महाराष्ट्राचाही संबंध आहे. अलिकडे पुणे नाशिकच्या पट्ट्यात याचा मोठी अमली पदार्थ तस्करी करणारी रँकटे आहेत. याची माहिती असतानाही कारवाई होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Prakash Ambedkar
Ajit Pawar: 'पवार साहेब असं स्टेटमेंट करतात की डोकं खाजवायला लावतात', अजित पवार पुन्हा बोलले; नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यात सहभागी आहेत असं आम्ही म्हणत नाही, मात्र अमली पदार्थांच्या विळख्यात सापडून राज्यातली तरुण पिढी अडकत असताना कारवाई का केली जात नाही? याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिलं पाहिजे. त्यांच्यावर केंद्रातील कोणत्या मंत्र्याचा दबाव आहे का? याचाही खुलासा करावा असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Prakash Ambedkar
Supriya Sule News: 'कोणाला काय मिळालं हिशोब करा, सगळं स्पष्ट होईल', सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर पलटवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com