Prahar Sanghatana Andolan : सरकराच्या विराेधात 'प्रहार' आक्रमक, अमरावतीसह वर्धेत छेडलं आंदाेलन

मागण्या तातडीने मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे प्रहारच्या वतीने सांगण्यात आले.
prahar sanghatana andolan in amravati
prahar sanghatana andolan in amravatisaam tv
Published On

- अमर घटारे / चेतन व्यास

Prahar Sanghatana Andolan :

अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या अहवालात तिवसा तालुका वगळल्याने प्रहार संघटनेच्या माध्यमातून आज अमरावतीत महसूल विभागाच्या विरोधात दशक्रिया आंदोलन करण्यात आले. दूसरीकडे वर्धा जिल्ह्यात देखील प्रहारने उमेद अभियानाला कॅडर घाेषित करावे आदी मागण्यांसाठी आंदाेलन छेडले. (Maharashtra News)

अमरावती जिल्ह्यातील तिवसा महसुल प्रशासनाच्या विरोधात प्रहारच्या वतीने आज (मंगळवार) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दशक्रिया आंदोलन सुरू करण्यात आले. या 2 महिन्यात दिवसा तालुक्यातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या फोटो समोर विधीवत दशक्रिया पूजा करून यावेळी प्रहार कडून दशक्रिया करण्यात आले.

prahar sanghatana andolan in amravati
Makar Sankranti 2024: जखमी पक्षांसाठी 'सहयोग' पक्षी चिकित्सालय, पतंगोत्सवात नायलाॅन मांजा वापरु नका; नंदुरबारवासियांना आवाहन

अवकाळी पावसामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापूस, तूर, हरबरा, संत्रा पिकाचे मोठ्या प्रमानात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे असा दावा प्रहार कडून करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

23 नोव्हेंबरला तिवसा तालुक्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. तब्बल 5 ते 6 दिवस या अवकाळी पावसाने हाताशी आलेले पीक नष्ट झाले होते. तिवसा तालुक्यात देखील अवकाळी पावसाचा फटका बसला होता.

हा प्रकार संपूर्ण तिवसा तालुक्यात घडला असल्याची लोकांची ओरड होऊन देखील तिवसा महसूल विभागाने सर्वेक्षणाचे आदेश दिलेच नाही. त्यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण होवू शकले नाही. त्यामुळे तिवसा तालुका अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पात्रता यादीमध्ये समाविष्ट हाेऊच शकला नाही. त्यामुळे तातडीने तिवसा तालुका अवकाळी पावसाच्या नुकसान ग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करावा अशी मागणी प्रहारने केली आहे.

वर्धा जिल्ह्यात प्रहारचे आंदाेलन

उमेद अभियानाला कॅडर म्हणून घोषित करावे,उमेद कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करत मानधन त्यांच्या खात्यात थेट जमा करावी या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यासाठी आज (मंगळवार) प्रहारच्या वतीने वर्धेच्या छत्रपती शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आला.

prahar sanghatana andolan in amravati
Buldhana News : बुलढाण्यात उपक्रम, कारसेवक वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ २ लाख २१ हजार दिव्यांचे वाटप

उमेद अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या महिलांच्या विविध मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात प्रहारच्या माध्यमातून वर्धा ते नागपूर पायदळ मोर्चा काढत सरकारला या कर्मचाऱ्यांच्या समस्या सांगण्यात आल्या होत्या. मात्र यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे आजचे आंदाेलन असल्याचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

prahar sanghatana andolan in amravati
Chandrapur News : पतंगचा माेह... भानापेठेत घराच्या छतावरून पडून एकाचा मृत्यू; नागपूरात नागरिकांसह पक्षी जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com