Maharashtra Politics: महाराष्ट्रात 'कुछ तो बडा होने वाला है'; राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीचा अर्थ काय?

Political News Maharashtra: महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. एका बाजुला एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय बदलाची अटकळ बांधली जात आहेत.
Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawarsaamtv
Published On
Summary
  • मुंबई आणि दिल्लीत महत्त्वाच्या राजकीय बैठका सुरू आहेत.

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत.

  • राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईत बैठक घेत आहेत.

  • या घडामोडींमुळे राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे.

मुंबई आणि दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलाय. मुंबईत राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक सत्र चालू आहे. दुसरीकडे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठत तेथे ते ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी करत आहेत. यामुळे राज्यातील महायुती सरकारमध्ये मोठ्या हालचाली होत आहेत. नेमकं काय घडतंय हे मात्र अद्याप समोर आले नाहीये. त्यामुळे राज्यातील राजकारणात काहीतरी उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे.

एका बाजुला मुख्यमंत्री फडणवीस यांनी वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांना तंबी दिली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा. ते दोन दिवसांपासून दिल्लीला तळ ठोकून आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. त्यापाठोपाठ अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय.

यासर्व घडामोडीमुळे राज्यातील राजकारणात मोठं काहीतरी घडणार आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरूय. राजकीय जाणकार तर्क- वितर्क काढत आहेत. तरी काही जाणकारांच्या मते, राज्यातील राजकारणात मोठं काही होण्याची तिळमात्र शक्यता नाहीये.

Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar
Manikrao Kokate : रमीच्या डावामुळे माणिकराव कोकाटेंचे खातं जाणार? कुणाला मिळणार कृषिमंत्रीपद?

भेटीगाठी अन् बैठकांचा अर्थ काय?

राज्यातील या सर्व घडामोडींवर राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार शिरवडकर म्हणतात की, भेटीगाठी होणं साधरण आहे. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी या होत असतात. तसेच या भेटीगाठींमुळं लगेच सरकारमध्ये काही उलथापालथ होईल असं काही वाटत नाही.

राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी या होतच असतात. त्यांच्याकडं अनेक विभागांची जबाबदारी असते. त्या-त्या विभागांशी आणि खात्यांशी संबंधित कामे असू शकतात. प्रत्येक वेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित भेटी घ्यायला हव्यात किंवा त्यांनी प्रत्येक वेळी एकत्र जाणं गरजेचं नाही. याशिवाय राजकीय वर्तुळात इतक्यात मोठं काय घडेल अशी चिन्हे नाहीत. मात्र महायुतीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ती सकारात्मक नाही एवढं मात्र नक्की! या भेटीगाठींमुळं लगेच सरकारमध्ये काही उलथापालथ होईल, असं काही वाटत नाही.

- ज्येष्ठ पत्रकार संजीव शिवडेकर

कोकाटेचं खातं जाणार, मुंडेंची वर्णी लागणार?

दरम्यान रमी गेम, वादग्रस्त विधान करणं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे भोवणार आहे. त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांच्याकडील खातं काढून घेतलं जाणार असल्याची चर्चा सुरू झालीय. त्याचदरम्यान कृषी मंत्रिपदासाठी धनंजय मुंडे लॉबी तयार करत आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापासून महायुतीमधील अनेक मंत्री आणि आमदार विविध कारणांमुळे वादात आलेत.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, संजय शिरसाट,भरत गोगावले याच्या व्हिडिओमुळे एकनाथ शिंदे याच्या गटाची नाचक्की झाली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानामुळे अजितदादा अडचणीत आलेत. यासर्व प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीमाना घ्या, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

त्याचपार्श्वभूमीवर आज सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. तेथे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील सकाळपासून सह्याद्री अतिथीगृहावर आहेत.

त्यानंतर मुंडे यांनीही सह्याद्री गाठल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विधान परिषदेत रमी खेळल्यानं वादात सापडलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करण्यासाठी फडणवीस आग्रही आहेत. कोकाटे यांचा राजीनामा घेतला तर त्यांच्या जागी मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com