

एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना
नाराजीनाट्यानंतर शिंदे अमित शहांना भेटणार
दुसरीकडे शहाजी बापू पाटीलही भावुक
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिंदे दिल्लीला गेले आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणावरून युतीमधील मित्रपक्षासोबत मतभेद निर्माण झाल्याचे बोलले जातंय. दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दुसरीकडे डोंगर झाडी फेम शहाजी बापू पाटीलही भावुक झाले आहेत. भाजपला मताधिक्य देऊनही एकटे पाडल्याची भावना शहाजी बापू पाटील यांनी बोलून दाखवली आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिंदेंच्या दिल्ली भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. युतीमध्ये राहून मित्रपक्षच शिवसेनेला संपवत असल्याचा आरोप केला जात आहे. शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीत काय तोडगा निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. दुसरीकडे राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे पडघम पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीही फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे. याच फोडाफोडीच्या राजकारणावर शहाजी बापू पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे.
शहाजी बापू पाटील म्हणाले, 'लोकसभेला मृत्यूच्या दारात असताना मी भाजपच्या उमेदवाराला 15 हजाराचे मताधिक्य दिलं. याचं फळ म्हणून मला सांगोल्यात एकटे पाडले का? सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपने ऐनवेळी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून शिवसेनेविरोधात दंड थोपटले आहेत'.
'सांगोल्यात जे घडलं त्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावं. माझं दुःख हेच आहे. भाजपचा शब्द मोडला नाही. मोहिते पाटील उमेदवार असताना 15 हजार मतांचे मताधिक्य दिलं. मी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेऊन वेळेत वैद्यकीय उपचार घेतले. तर माझा आजार कॅन्सरकडे गेला नसता. भाजप उमेदवारासाठी मी मृत्यूशी झुंज दिली. डॉक्टर मला उपचार घ्या म्हणत होते.
'तातडीने ऑपरेशन करा म्हणत होते. मी भाजप उमेदवारासाठी तीन महिने डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही. आज एका नगरपालिका आणि नगराध्यक्ष पदासाठी भाजपने मला एकटे पाडले, अशा भावना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपच्या खेळीमुळे व्यक्त केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.