Satyajeet Tambe : बंडखोरी, पक्षांतर्गत विरोध, बाळासाहेब थोरात... सर्व मुद्यांवर सत्यजित तांबे पहिल्यांदा सविस्तर बोलले

सत्यजित तांबेंनी बंड का केलं? नक्की त्यांना विरोध कुणाचा होता ज्यामुळे त्यांनी बंडखोरी करावी लागली.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSaam Tv
Published On

Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र सत्यजित तांबे यांच्याबाबत अद्याप भाजपने भूमिका स्पष्ट केलेली नाही. मग सत्यजित तांबे आणि तांबे कुटुबियांनी या निवडणुकीआधी घेतलेल्या भूमिकेबाबत काही प्रश्न अनुत्तरित आहेत.

सत्यजित तांबेंनी बंड का केलं? नक्की त्यांना विरोध कुणाचा होता ज्यामुळे त्यांनी बंडखोरी करावी लागली. या प्रश्नाची उत्तरे सत्यजित तांबे यांनी 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहेत. (Latest Marathi News)

Satyajeet Tambe
Eknath Shinde : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांना कसं पटवून दिलं? CM शिंदे म्हणाले...

बंड का केलं? या प्रश्नावर बोलताना सत्यजित तांबे यांनी सांगितलं की, मी अत्यंत नम्रपणे आपल्याला सांगतो की मी बंड केलेले नाही. माझ्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नव्हता. शिवाय आम्ही काँग्रेस श्रेष्ठींना राजकीय परिस्थिती पाहून वडील किंवा मी उमेदवारी अर्ज दाखल करेल असे स्पष्ट सांगितलं होतं. मात्र ऐनवेळी डॉ. सुधीर तांबे यांचे नाव जाहीर झाले आणि एबी फॉर्म ही त्यांच्याच नावाचे आले, तांत्रिक अडचण झाली, आणि मला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला.

त्यामुळे याला बंड म्हणता येणार नाही. मात्र गेली दोन आठवडे जे सुरू आहे, ते आमच्या कुटुंबियांच्या विरोधात शत्रुत्वाच्या भावनेने व ठरवून केलेले राजकारण आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ निष्ठापूर्वक काँग्रेससोबत राहिलेल्या आमच्या कुटुंबाला निष्ठा शिकवण्याची स्टंटबाजी काही मंडळींकडून सुरू आहे, असं सत्यजीत तांबे म्हणाले.

Satyajeet Tambe
BBC Documentary In TISS : बीबीसी डॉक्युमेंट्रीवरून 'टीस'मध्ये वादंग, माहितीपट दाखवण्यावर विद्यार्थी ठाम, भाजप आक्रमक

बावीस वर्षांपासून मी माझ्या रक्ताचं पाणी करुन संघटनेत काम केले आहे, या असल्या आरोपांनी तो संघर्ष पुसता येणार नाही. सध्या मी पूर्णतः निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. निकालानंतर आमच्या कुटुंबासोबत घडलेल्या राजकारणावर सविस्तर बोलेल.

दरम्यान बाळासाहेब थोरातांबद्दल बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, बाळासाहेब थोरात आमचे मार्गदर्शक आणि कुटुंबप्रमुख आहेत. त्यांनी काँग्रेस कडूनच आपल्याला उमेदवारी करायची आहे, असे स्पष्ट सांगितले होते. माझ्या मनातही त्याबद्दल शंका नव्हती. मात्र एबी फॉर्म नसल्याने तांत्रिक अडचण झाली आणि मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. माझ्यामुळे त्यांची राजकीय अडचण व्हावी, अशी ही माझी इच्छा नाही. राहिला प्रश्न त्यांच्या शुभेच्छांचा तर आम्ही सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनातच वाढलो आणि घडलो आहोत. त्यांच्या शुभेच्छामाझ्या सोबत असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com