BBC Documentary In TISS : बीबीसी डॉक्युमेंट्रीवरून 'टीस'मध्ये वादंग, माहितीपट दाखवण्यावर विद्यार्थी ठाम, भाजप आक्रमक

बीबीसीची डॉक्युमेंट्री टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्समध्ये दाखवण्यात यावी, यावर विद्यार्थी ठाम आहेत
BBC Documentary Screening Row In TISS
BBC Documentary Screening Row In TISS Saam TV
Published On

रुपाली बडवे, साम टीव्ही

BBC Documentary Screening Row In TISS : बीबीसीच्या मोदींवरील वादग्रस्त डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरून जेएनयू, जामिया आणि दिल्ली विद्यापीठात गदारोळ झाल्यानंतर आता या वादाचे लोण महाराष्ट्रातील मुंबईत पसरले. बीबीसीची डॉक्युमेंट्री टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्समध्ये दाखवण्यात यावी, यावर विद्यार्थी ठाम आहेत, तर प्रशासनाने डॉक्युमेंट्री दाखवण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे भाजप आक्रमक झाला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टीसच्या बाहेर आंदोलन केलं. (Latest Marathi News)

BBC Documentary Screening Row In TISS
Dhananjay Munde : मराठवाड्यातील सर्व निवडणुका 'मविआ'च जिंकणार; दळभद्री भाजपच्या हाती.., धनंजय मुंडेंची जहरी टीका

मुंबईतील 'टीस'च्या कॅम्पसमध्ये बीबीसीची नरेंद्र मोदींवरील (PM Modi) वादग्रस्त डॉक्युमेंट्री दाखवण्यावरून वाद सुरू झाला आहे. कॅम्पसमध्ये डॉक्युमेंट्री दाखवण्यावर विद्यार्थी ठाम आहेत. PSF चा विद्यार्थी रामदास यानं सांगितलं की, एक डॉक्युमेंट्री दाखवण्यावरून एवढा वाद का व्हावा? आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून, संध्याकाळी ७ वाजता डॉक्युमेंट्री बघणारच, असं त्याचं म्हणणं आहे.

दुसरीकडे, बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगला टीसच्या प्रशासनानं नकार दिला आहे. टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सकडून विद्यार्थ्यांवर (Students) कारवाईचा इशारा दिला आहे. तर यासंबंधी विद्यार्थ्यांसाठी सूचना पत्र जाहीर केले आहे.

BBC Documentary Screening Row In TISS
Thackeray vs Shinde : धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय कधी? समोर आली महत्वाची माहिती

२७ तारखेला सूचना पत्र देऊनही पुन्हा संस्थेच्या परिसरात काही संघटना आणि काही विद्यार्थी गट हे भारतात बंदी घातलेल्या डॉक्युमेंट्रीच्या प्रदर्शनावर ठाम असल्याचे समोर आले आहे. संबंधित विद्यार्थी गटाच्या वागणुकीमुळे जर शांतता भंग झाली आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर, विद्यार्थ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा उल्लेख या सूचना पत्रात केला आहे.

भाजपचा विरोध

'टीस'च्या परिसरात बीबीसी डॉक्युमेंट्री दाखवण्यावर विद्यार्थी ठाम आहेत. तर त्याला भाजपने (BJP) विरोध दर्शवला आहे. भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी टीसच्या परिसरात पोहोचले. त्यांनी मोदींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भाजप युवा मोर्चाकडून टीसच्या प्रशासनाला भेटून यासंबंधी पत्र देणार असल्याचे सांगण्यात आले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com