NCP आमदाराचा PA असल्याची बतावणी करून सरपंच पतीला गंडवलं; ७ लाखांना लुबाडलं | Beed News

Political Fraud: बीडमध्ये आमदार विक्रम काळे यांचे बनावट सहाय्यक असल्याची बतावणी करत सरपंच पतीची ७ लाखांची फसवणूक. पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू.
 Beed Crime
Vikram Kale fake assistant scams villagerSaam TV News
Published On

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विक्रम काळे यांचे स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करून सरपंच पतीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास सात लाखांना गंडा घातला असून, तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नयन शेजूळ असं बतावणी करून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे‌. त्याने बीडमधील सरपंच पती उत्तरेश्वर खताळ यांना आमदार फंडातून काम मिळवून देतो असं सांगत पैसे उकळले. मिळालेल्या माहितीनुसार, शेजुळ यानं आमदार निधी किंवा जिल्हा परिषदेमार्फत काम मिळवून देतो, असे सांगून फसवलं. जवळपास ६ लाख ७० हजार रूपये घेऊन काम लावतो, असं सांगितलं.

 Beed Crime
BJP: भाजप नेत्याचा मृतदेह बाल्कनीत आढळला, हातही बांधलेले होते; परिसरात खळबळ

खताळ यांचं विश्वास संपादन करण्यासाठी त्याने बनावट ई मेल तयार केला. तसेच खोटे ई मेल पाठवून रकमेची मागणी केली. खताळ यानेही विश्वास ठेवून शेजुळला ठरलेली रक्कम पाठवली. मात्र, पैसे घेतल्यानंतर आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. पैसे घेतले मात्र कोणतंही काम मंजूर झाल्याचं खताळ यांच्या लक्षात आलं. त्यांनी थेट पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला.

 Beed Crime
Buldhana: वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती अन् लैंगिक अत्याचार; सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ..पती, सासू, नणंद अटकेत

उत्तरेश्वर खताळ यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठले. तसेच शेजूळ याच्याविरोधात फसवणुक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचा गांभीर्य लक्षात घेत शेजुळ याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केली असून, या प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com