Maharashtra Political Crisis : गणेशोत्सवापूर्वीच महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, दिग्गज नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Political News : राज्य सरकारमध्ये अंतर्गत नाराजी असून, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून नाराजीनाट्य वाढल्याचे विरोधकांकडून वारंवार बोलले जात आहे.
Maharashtra Political News, Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Maharashtra Political News, Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath ShindeSAAM TV
Published On

Maharashtra Political News : राज्य सरकारमध्ये अंतर्गत नाराजी असून, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून नाराजीनाट्य वाढल्याचे विरोधकांकडून वारंवार बोलले जात आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू असतानाच, येत्या १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात बदल होईल, असा दावा काँग्रेस नेत्यानं केला आहे. या दाव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गट सत्तेत आहे. या सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. विशेषतः अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यापासून नाराजीनाट्य वाढल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही विरोधक करत आहेत.

Maharashtra Political News, Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Saamana Editorial: 'उप'ची नशा ही देशी बनावटीची; फडणवीस, सांभाळा! सामनातून उपमुख्यमंत्र्यांवर टीका

सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही मोठा दावा केला आहे. कधी पुण्याचे, तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. तिघे जण कधीही एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री एकत्र आले तर, मुख्यमंत्री येत नाहीत. हे जे काही राज्यात सुरू आहे, त्यावरून आलबेल आहे की नाही हे स्पष्ट दिसत आहे. हा सगळा तमाशा, नाटक महाराष्ट्राला दिसत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

Maharashtra Political News, Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Amol Kolhe: वाढीव आमदार निधीवरुन अमोल कोल्हेंचा अजित पवारांना चिमटा; म्हणाले, आमदार निधी पाच कोटी केला तर...

सत्तेसाठी सर्व काही सुरू आहे. येत्या काही दिवसांत म्हणजे १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात बदल होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. मुख्य खुर्चीपासून बदलाला सुरुवात होईल. सप्टेंबरमध्ये सत्ताबदल होईल. याचा अर्थ आमची सत्ता येईल असा नाही, पण मुख्य खुर्ची नक्की बदलेल हे ठासून सांगतोय, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

शेतकरी प्रश्नांवरूनही सरकारवर टीकास्त्र

यावेळी वडेट्टीवार यांनी शेतकरी प्रश्नांवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. पावसाच्या दडीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. काही जिल्ह्यांत कोरडा दुष्काळ पडेल, अशी स्थिती आहे. सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com