Amol Kolhe: वाढीव आमदार निधीवरुन अमोल कोल्हेंचा अजित पवारांना चिमटा; म्हणाले, आमदार निधी पाच कोटी केला तर...

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदारांचा निधी पाच कोटी केलाय तर केंद्रात मोदी सरकार अजून खासदाराचा विकास निधी ५ कोटींच्या पुढे नेत नाहीये - अमोल कोल्हे
Amol Kolhe
Amol KolheSaamTV
Published On

Maharashtra Political: अर्थ खात्याची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती आल्यानंतर आठवडाभरातच त्यांनी आमदारांवर निधीवर्षांव केला आहे. निधीवाटपानंतर शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

"निधी वाटपाच्या बाबतीत अजित पवारांनी आमची अडचण केलीये. ती राजकीय अडचण नाही तर गोड आहे, असं म्हणत पुढे अजित पवारांवर ५ कोटी निधीवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदारांचा निधी पाच कोटी केलाय तर केंद्रात मोदी सरकार अजून खासदाराचा विकास निधी ५ कोटींच्या पुढे नेत नाहीये. त्यामुळे सहा मतदार संघांसाठी ५ कोटी आणि इकडे एका मतदार संघासाठी ५ कोटी. म्हणजे हे समिकरण तुम्हाला सांगणं एवढंच की, जेव्हा आमदारांकडून १०० रुपये येतील तेव्हा खासदारांकडून फक्त १६ रुपये येऊ शकतात. असं सरकारनेच करुन ठेवलं आहे. याची आपण नोंद घेतली पाहिजे.", असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

Amol Kolhe
Maharashtra Political News : शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्रिपद मिळणार? विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

विधानसभा मतदार संघासाठी ५ कोटी निधी देण्यात येत आहे. त्यामुळे खासदारांवर अन्याय होत असून आमदारांना केलेल्या वाढीव निधीवरुन अजित पवारांचे कौतुक करण्याऐवजी खासदार कोल्हेंनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलंय. यापूर्वी अजित पवारांच्या नावाचं कौतुक करणारे कोल्हे आज अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात बोलू लागलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com