Saamana Editorial: 'उप'ची नशा ही देशी बनावटीची; फडणवीस, सांभाळा! सामनातून उपमुख्यमंत्र्यांवर टीका

Saamana Editorial on Devendra Fadanvis: एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांड्या जात आहेत. फडणवीस, सांभाळा!", असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
devendra fadnavis
devendra fadnavis saam tv
Published On

Saamana Editorial News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साल २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर २०१९ साली देखील तेच मुख्यमंत्री होतील अशी चिन्हे दिसत असताना शिवसेनेनं त्यांची साथ सोडली. पुढे एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. फडणवीसांची ही राजकीय कारकीर्द पाहता आजच्या सामना अग्रलेखातून फडणवीस, सांभाळा! असं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

"देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण 'उप' झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली आणि अहंकाराचे ते महामेरू बनले. 'मुख्य'चा 'उप' झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही आणि भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. 'उप'ची नशा ही 'देशी' बनावटीची आहे. कधीकाळी 'मुख्य' असणाऱ्याने आज अशी 'देशी' स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांड्या जात आहेत. फडणवीस, सांभाळा!", असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

devendra fadnavis
Beed Crime News: धक्कादायक घटना..जन्मदात्याची मुलानेच केली हत्या; आईच्या चारित्र्यावर घ्यायचा संशय

पुढे "मी पुन्हा येईल" या वाक्यावरुन देखील देवेंद्र फडणवीसांना सामनातून चिमटा काढण्यात आला आहे. " उपमुख्यमंत्री फडणवीस, ते सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत. "मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच," असे फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे. गेल्या वर्षभरात त्यांचे हे 'पुनः पुन्हा' प्रकरण इतक्या वेळा झाले आहे की, जनतेच्या शब्दकोशातून 'पुन्हा' हा शब्द बाद होण्याची शक्यता आहे. "

म्हणून शिवसेना-भाजप युती तुटली

"बेइमानी केली ती भाजपच्या सध्याच्या दिल्लीश्वरांनी. सत्तेचे वाटप समसमान करण्याचा शब्द देऊन तो फिरवण्यात आला व श्री. फडणवीस हे त्याचे साक्षीदार आहेत. ही बेइमानी तेव्हा झाली नसती तर महाराष्ट्रात फडणवीस सन्मानाने पुनः पुन्हा आलेच असते आणि फौजदाराचा जमादारही झाला नसता हे सत्य 'प्यारे' फडणवीस नाकारू शकत नाहीत. 2019 च्या बेइमानीमुळेच शिवसेना-भाजपची युती तुटली. ", शिवसेना-भाजप युती तुटल्याचं हे कारण सामनातून सांगण्यात आलं आहे.

सामनातून पुढे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर देखील टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. "मी पुन्हा पुन्हा पुन्हा 'उप उप उप उप' म्हणून आलो'' हे घोषवाक्य अजित पवारांना शोभते. पुन्हा ज्या पवारांना फडणवीस चक्की पिसायला पाठवणार होते, त्यांना बाजूला बसवून ते काय आता सत्यनारायणाची पूजा सांगत आहेत?", असा प्रश्न फडणवीसांना सामनातून विचारण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com