Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण झाली नावडती! महिलेकडून ₹ ७५०० वसूल करताच विरोधक बरसले, कोण काय म्हणालं?

Political reactions on Ladki Bahin Yojana: धुळ्यात एका लाभार्थी महिलेला मिळालेले ७५०० रूपये सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाले असून, लाडक्या बहिणी आता चितिंत आहेत. यावर काही नेत्यांनी टोला तर काहींनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.
Ladki bahin yojana
Ladki bahin yojanaSaam Tv News
Published On

लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली. मात्र, मंत्रीमंडळ स्थापन झाल्यानंतर आदिती तटकरे यांनी, महिलांकडून तक्रार आली तर, अर्जांची छाननी करून अर्ज बाद करणार असल्याचं सांगितलं. अशातच लाडकी बहीण योजनेची रक्कम पुन्हा सरकारजमा होणार असल्याची चर्चा आहे. निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू झाली असून, धुळ्यात एका लाभार्थी महिलेला मिळालेले ७५०० रूपये सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाले आहेत. यावर काही नेत्यांनी टोला तर काहींनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

धुळ्यातील एका लाभार्थी महिलेचे पैसे सरकराच्या तिजोरीत जमा झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. 'हे अपेक्षित होतं. मी अगोदरही बोलले होते. मला आरोप करायचं नाहीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत. ते महत्त्वाच्या पदावर बसले आहेत. राज्याचं फिस्कल डेफिसिट पाहा, कधी तरी पॉलिसीवर बोललं पाहिजे. मी डेटा देईल. डीपीडीसीचे पैसे वळवले जात आहेत. महिलांची फसवणूक होत आहे.'

Ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! अपात्र लाडक्या बहि‍णींवर कारवाई, ५ महिन्याचे ७५०० रूपये सरकारने घेतले माघारी

लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. 'लाडक्या बहि‍णी आणि सरकारमधील हा विषय आहे. आम्ही लाडक्या बहि‍णींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणणं आहे. पण आता ज्यांचे पैसे परत घेणार आहात त्यांची मतही परत द्या. हा विषय अत्यंत गंभीर आहे. यात मोठा घोटाळा झालेला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी झालेला हा प्रकार होता. भविष्यात ही योजना राहील की नाही, यात संशय आहे.'

लाडकी बहीण संदर्भात काँग्रेस नेते, विजय वडेट्टीवार यांनी 'पाप लागेल सरकारला' असं म्हणत संतप्त प्रतिक्रिया दिलीय. सरकारला कटोरा घेऊन भिक मागण्याची वेळ आलीय. पैसे देऊन मत घेतली, त्यावेळी निकष लावले नाही का? आता कशाला लावत आहात? पाप लागेल यांना, लावलेले निकष निम्म्यापेक्षा अधिक आहेत. अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

Ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे माघारी घेण्यास सुरुवात, अटी काय?

यावर आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. 'केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी काही वर्षांपूर्वी एक योजना आणली होती. सुरुवातीला शेतकर्‍यांना पैसे मिळाले. परत टप्प्याटप्प्यानं ७० टक्के शेतकर्‍यांचे पैसे थांबले. आता निवडणुका झाल्या. भाजप मित्र पक्षाला बहुमत मिळालं. आता हळूहळू आमच्या लाडक्या बहिणींना वंचित ठेवतील. अनेक बहि‍णी वंचित आहेत. ज्यांना लाभ मिळाला त्यांचा अर्ज बाद करण्यात येत आहे. या विरोधात आम्ही आहोत, लाडक्या बहि‍णींसाठी लढू.' असं पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com