Police Bharati 2024: राज्यभरात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात; मैदानी चाचणीसाठी पहाटेपासूनच उमेदवारांची गर्दी; पाहा VIDEO

Maharashtra Police Bharati In Pune Amaravati kolhapur District: राज्यात आजपासून पोलीस भरती सुरू झाली आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि अमरावती या जिल्ह्यांत भरतीच्या दृष्टीने प्रशासन सज्ज झालं आहे.
पोलीस भरती
Police Bharati 2024Saam Tv

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती आजपासून सुरू होतेय. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. दरम्यान, या मेगा भरतीसाठी पुणे पोलिसांनी देखील तयारी केली आहे.पुण्यात पुणे शहर, ग्रामीण, लोहमार्ग पोलीस दल, कारागृह विभागातील १ हजार २१९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या जागांसाठी तब्बल १ लाख ८१ हजार ७६९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पुण्यात भरतीसाठी मोठी स्पर्धा आहे. ही भरती प्रक्रिया पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, पाषाण रस्त्यावरील ग्रामीण पोलिसांचे चव्हाणनगर येथील मुख्यालयात आणि खडकीतील लष्कराच्या दारूगोळा कारखान्याच्या मैदानावर पार पडणार आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील १७,४७१ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार (Maharashtra Police Bharati) आहे. ही भरती प्रक्रिया राज्यात सुरू होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, जेल कॉन्स्टेबल, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन यासह विविध पदांसाठी १७,४७१ रिक्त जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे. पुणे पोलीस दलात २०२ पदांसाठी २० हजार ३८२ अर्ज, पुणे जिल्हा ग्रामीण दलामध्ये ४९६ पदांसाठी ४२ हजार ४०३ उमेदवारांनी अर्ज, कारागृहातील शिपाई पदाच्या ५१३ जागांसाठी एक लाख १० हजार ४८८ अर्ज, पुणे लोहमार्ग विभागाच्या ६८ पदांसाठी ३ हजार १८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

बायोमेट्रिक पद्धतीने तपासणी केली जात आहे. पावसामुळे मैदान खराब होऊ नये, यासाठी मैदान ताडपत्रीने झाकून ठेवण्याची व्यवस्था केली आहे. पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यात कोणाला डावलले जाऊ नये, तसेच पैशांचा गैरवापर होऊ वये, यासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला (Police Recruitment 2024) आहे. यंदा पोलीस भरतीत योग्य उमेदवाराची निवड केली जावी, यासाठी रेडीओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्र ( RFID ) वापर करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई 448 आणि चालक पोलीस शिपाई 48 पदे भरण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस शिपाई- चालक पदासाठी मैदानी आणि चाचणी परीक्षा 19 जुन ते 28 जुन 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे. यासाठी 5 हजार 3140 उमेदवार यांनी अर्ज केले आहेत, तर पोलिस शिपाई पदासाठी 42 हजार 403 उमेदवारांनी अर्ज केले ( MaharashtraPolice Recruitment 2024) आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार आहे.

जर पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही, तर त्यांना पुढची योग्य तारीख दिली जाणार आहे. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल, अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल. रनिंगसाठी अडचण येऊ नये म्हणून ताडपत्रीचा ही वापर पुणे पोलिसांकडून करण्यात (Police Bharati 2024) आलाय. त्याचबरोबर बायोमेट्रिक पद्धतीने प्रत्येक उमेदवाराची हजेरी घेऊन तपासणी केली जात आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

पोलीस भरती
Pune Police Bharati: कानात ब्लुटुथ अन् शर्टावर कॅमेरा लावून कॉपी, पोलीस भरती परीक्षेत मराठवाडयातील ‘हाय-टेक’ रॅकेटचा पर्दाफाश

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालीय. पहाटे पाच वाजल्यापासून कसबा बावडा इथल्या पोलीस परेड ग्राउंडवर ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदासाठी 154 तर पोलीस चालक पदासाठी 59 पदांच्या भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी एकूण 11 हजार 445 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही प्रक्रिया आज पासून 27 जून या कालावधीत राबविण्यात येणार येत आहे.दरम्यान यंदा पहिल्यांदाच भरती प्रक्रियेमध्ये अचूक वेळ मोजण्यासाठी आणि उमेदवार डमी होऊ नये, याकरिता अत्याधुनिक पद्धतीचे RFID आणि FACE Recognation या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं आहे.

अमरावती जिल्ह्यात उद्यापासून पोलीस भरतीला सुरवात होणार आहे. अमरावती ग्रामीण पोलीसमध्ये 207 जागेसाठी भरती होणार आहे. त्यासाठी 27 हजार 981 उमेदवारांचे अर्ज आले आहेत, तर अमरावती शहर पोलिसांसाठी 74 जागेसाठी 4 हजार 789 अर्ज आले आहेत. एकूण शहर ग्रामीण मिळून 281 जागेसाठी ही पोलीस भरती होणार आहे. यासाठी तब्बल 32 हजार 770 अर्ज आले आहेत. मैदानी चाचणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. 19 जुनला म्हणजे आज 800 उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. कागदपत्रं परिपूर्ण असलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. तत्पूर्वी उंचीचे मोजमाप होणार आहे. पावसात मैदानी चाचणीत व्यत्यय आला तरी दुसऱ्या दिवशी उमेदवारांना संधी मिळणार आहे. पावसामुळे कोणत्याही उमेदवारांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, उमेदवारांची सगळी व्यवस्था केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितलं आहे.

पोलीस भरती
Police Bharati 2022 : तरुणांनो तयारीला लागा! पोलीस भरतीची तारीख ठरली, या दिवशीपासून करता येईल अर्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com