Sangali News : लग्नात ड्रोन उडवण्याआधी परवानगी सक्तीची; अन्यथा विना आमंत्रण पोलीस पोहोतील घरी

सुरक्षेच्या कारणावरून पोलीस विभागाने हा निर्णय घेतला आहे.
Drone
DroneSaamTv

>> विजय पाटील

सांगली : लग्न समारंभ म्हटलं की फोटोशूट आलं. नव्या टेक्नोलॉजीमुळे फोटोशूटची पद्धतही बदलली आहे. लग्नांमध्ये आता सर्रासपणे ड्रोन कॅमेरे (Drone Camera) वापरताना दिसतात. मात्र सांगली जिल्ह्यात लग्न समारंभात ड्रोन वापरताना यापुढे पोलीस परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय ड्रोन वापरता येणार नाही.

सुरक्षेच्या कारणावरून पोलीस विभागाने हा निर्णय घेतला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात अर्जाद्वारे परवानगी घेता येणार आहे. त्यामुळे यापुढे विना परवाना लग्नात ड्रोनचा वापर केल्यात अडचण निर्माण होऊ शकते.  (Latest News)

Drone
Sindhudurg News: भास्कर जाधवांच्या अडचणीत वाढ, पोलीस घरी पोहोचले

दिवाळीनंतर काही दिवसांत मोठ्या उत्साहात लग्नसराईला सुरुवात होते. तुळशी विवाह झाल्यानंतर तर सलग मुहूर्त असल्याने लग्नाचे बार उडवले जातात. यात अनेकजण शुटिंगसाठी सध्याच्या ट्रेंडनुसार अत्याधुनिक साधनांचा वापर करतात. त्यातही ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शूटिंग केले जाते. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून आता यासाठी पोलिसांची परवानगी अनिवार्य असणार आहे. पोलीस परवानगीशिवाय ड्रोन आकाशात उडवल्यास त्यावर कारवाई होणार आहे.

Drone
आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद मिटणार? मुख्यमंत्री करणार मध्यस्थी

शहरात ' नो फ्लाईंग झोन शहरात मोबाईल टॉवर , विजेचे खांब यांसह झाडे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उंचच्या उंच इमारती आहेत. त्यामुळे शहरात ड्रोन वापरताना अगोदरच अडचणी येतात. यात ड्रोन उडवताना अंदाज चुकल्यास त्याद्वारे दुर्घटनाही घडण्याची शक्यता असते. त्यामुळे लग्न समारंभासाठी इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी ड्रोनचा वापर करायचा असेल तर त्यासाठी परवानगी आवश्यक असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com