अहमदनगर ः गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. नवनाथ ढवळे हे पारनेर तालुक्यातील वडझिरे गावाचे सुपूत्र आहेत. आता ते ठाणे जिल्हातील शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर काम करीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल हा सन्मान करण्यात येणार आहे. ढवळे 2015-2017 या काळात गडचिरोली जिल्हा पोलीस दलामध्ये ऑपरेशन उपविभागीय पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.
या काळात त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहिमा यशस्वी केल्या. त्यातील मे 2016 मध्ये धानोरा उपविभागातील चातगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा जंगल परिसरात नवनाथ ढवळे यांनी त्यांच्या टीमने कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी आणि तिच्या सोबत सहा वरीष्ठ नक्षलींचा खत्मा केला.
ही चकमक तब्बल 12 तास सुरू होती. ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाची बाजी लावत ही कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.
गडचिरोलीत काम करीत असताना अनेक आव्हाने समोर होते. त्यातून मार्ग काढत सहकाऱ्यांच्या मदतीने अनेक यशस्वी मोहिमा पार पडल्या. हा त्या कार्याचा झालेला सर्वोच्च सन्मान आहे. या पुरस्काराने काम करणाऱ्या माझ्यासह अनेकांना पुढे काम करण्यास ऊर्जा मिळते, असे नवनाथ ढवळे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.