PWD Department News, Chiplun
PWD Department News, Chiplunsaam tv

PWD Department News : सार्वजनिक बांधकाम विभागात चार काेटींचा घाेटाळा; सात अटकेत

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा विभागातील व्यवहारात काहीशी अनियमीतता आल्याने झाली कारवाई.
Published on

- जितेश काेळी

PWD Department News : चिपळूण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा विभागातील दोघांनी ४ कोटी ८ लाखाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ठेकेदारांनी ठेवलेली अनामत रक्कम परस्पर ऑनलाईन पद्धतीने बोगस ठेकेदाराच्या नावाने वळवले आहे. या प्रकरणी एका महिलेसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.

या प्रकरणी जीवन मारूती खंडजोडे (वय ४८, मार्कंडी), प्रतिक प्रमोद भिंगार्डे (३०, वालोपे), रजनीश राजेंद्र टाकळे (३१, वालोपे), संदीप सुरेश आंबुर्ले (३५ पेठमाप), प्रविण दिलीप भिसे (३६, काविळतळी), परेश प्रमोद भिंगार्डे (३०, वालोपे, सध्या पिंपरी चिंचवड) व एका महिलेस पोलिसांनी (police) अटक (arrest) केली आहे. याबाबतची फिर्याद चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजीत रामसे यांनी दिली आहे. (chiplun latest marathi news)

PWD Department News, Chiplun
Raj Thackeray : राज ठाकरेंची काेकणवासियांनी कमिटमेंट अन् टाळ्यांचा गजर

गेले काही दिवस पोलिसामार्फत यविषयीची चौकशी सुरू होती. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात लिपीक म्हणून कार्यरत असलेले जीवन मारूती खंडझोडे व प्रतिक प्रमोद भिंगार्डे यांनी काही मित्र व नातेवाईकांच्या बँक खात्यात ऑनलाईन रक्कम वर्ग केली. त्यानंतर पुन्हा एक-दोन दिवसातच या दोघांनीही ही रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवली.

PWD Department News, Chiplun
Satara News : 'कोयनेच्या सुपुत्राला वेळ नाही ही निष्क्रियपणाची बाब'; पाटणकरांचा मुख्यमंत्र्यांवर राेष

तब्बल दोन वर्षे हा प्रकार टप्प्या-टप्प्याने सुरू होता. याविषयी खात्री पटताच पोलिसांनी संबंधीतांना ताब्यात घेत अटक केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का, यादृष्टीने पोलिस तपास सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी व पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी मोठ्या शिताफीने हा प्रकार उघडकीस आणला. तितक्याच तातडीने त्यांनी संशयीत आरोपींच्या मुसक्याही आवळल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

PWD Department News, Chiplun
Marriage : तुमच्या मुलाच्या लग्नासाठी स्थळ आले आहे ? थांबा ! हे वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com